महाराष्ट्र

वनक्षेत्र अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी- डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील वनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) यासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात हरित लवादाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले असून, याबाबत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्राची टक्केवारी अत्यंत कमी आहे. धाराशिव, बीड, लातूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये तर वनक्षेत्र १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. राज्याच्या एकूण भूपृष्ठाच्या सरासरी २० टक्के क्षेत्रावरच वनक्षेत्र आहे, जे आदर्श ३३ टक्क्याच्या निकषाच्या तुलनेत कमी आहे.या पार्श्वभूमीवर, डॉ. गोऱ्हे यांनी वनमंत्री नाईक यांना विशेष मोहिम आखून तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. तसेच, अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

8 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

23 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago