पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत शहराच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजप ११० जागांवर आघाडीवर असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मिळून केवळ १७ जागांपर्यंत मजल मारता आली आहे. काँग्रेसने १२ जागांवर आघाडी घेतली असली तरी ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आलेले नाही. मनसेलाही एकही जागा मिळालेली नाही. अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान, पुण्यात यंदाच्या निवडणुकीत एक अनोखा आणि चर्चेचा विजय पाहायला मिळाला आहे. भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या पती-पत्नीने विजय मिळवत राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुरेंद्र पठारे यांनी प्रभाग क्रमांक ४ मधून, तर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून विजय मिळवला आहे.
विजय जाहीर होताच सुरेंद्र पठारे यांनी पत्नीला उचलून घेत विजयाचा जल्लोष केला. भाजपकडून हे दाम्पत्य पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते. विशेष म्हणजे सुरेंद्र पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहरातील एकमेव आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र आहेत.
विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग १
अ – अश्विनी राहुल भंडारे (भाजप)
ब – संगिता दांगट (भाजप)
क – रेखा चंद्रकांत टिंगरे (राष्ट्रवादी)
ड – अनिल वसंतराव टिंगरे (भाजप)
प्रभाग ३
अ – श्रेयस प्रितम खांदवे (भाजप)
ब – अनिल दिलीप सातव (भाजप)
क – ऐश्वर्या पठारे (भाजप)
ड – रामदास दाभाडे (भाजप)
प्रभाग ८
अ – परशुराम वाडेकर (भाजप)
ब – अजित गायकवाड (भाजप)
क – सपना छाजेड (भाजप)
ड – सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण (भाजप)
पुण्यात नेमकं काय घडलं?
पुणे महापालिका निवडणुकीत सुरुवातीला चौरंगी लढत पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात होते. तर दुसरीकडे ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. मात्र या तिन्ही पक्षांच्या आघाडीला पुण्यात एकही जागा जिंकता आलेली नाही.दुपारी ४ वाजेपर्यंतचे हे आकडे असून सायंकाळपर्यंत काही बदल होण्याची शक्यता असली, तरी पुणे महापालिकेत भाजप सत्ता स्थापन करेल, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…
आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…
पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…
मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…