महाराष्ट्र

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित; त्यांच्या कुटुंबांसाठी समाजाने ठोस पावले उचलावीत

वाल्हे: देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या प्रत्येक सैनिकामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून समाजाने सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी ठोस केले पाहिजे, असे भावनिक प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा योगेश चिथडे यांनी केले.

वाल्हे येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी आयोजित यशोगाथा व प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन ॲड. विद्या नामदेव भुजबळ यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सतीश निगडे होते.

यावेळी सरपंच अतुल गायकवाड, सेवानिवृत्त कृषी अधिकारी सिद्राम भुजबळ, प्रा. नामदेव भुजबळ, बाळासाहेब राऊत, ज्योती एडके, माजी सरपंच विमल भुजबळ, अंकुश माळवदकर, रज्जाकभाई पानसरे, दामोदर पवार, साईनाथ चव्हाण, संजय ढावरे, सुचिता हिंगणे, सारिका बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चिथडे यांनी आपल्या कार्याची माहिती देताना सांगितले की, १९९९ साली पती योगेश चिथडे यांच्या सहकार्याने *‘सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’*ची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक, शैक्षणिक व मानसिक आधार देण्याबरोबरच वीरनारींना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

भारतीय सैनिकांसाठी राबविण्यात आलेल्या ठोस उपक्रमांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, सियाचिन, लेह, लडाख व जम्मू-काश्मीरसारख्या अतिदुर्गम भागात देशातील पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. कठीण हवामानात कार्यरत असलेल्या जवानांसाठी हे प्रकल्प मोठा आधार ठरत आहेत. हे कार्य म्हणजे सैनिकांप्रती कृतज्ञतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सैनिकांसाठी अखंड सेवाभाव जपणाऱ्या सुमेधा चिथडे यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, या हेतूनेच हा उपक्रम राबविण्यात आल्याचे ॲड. विद्या नामदेव भुजबळ यांनी सांगितले.

फाउंडेशनला भरभरून प्रतिसाद

कार्यक्रमानंतर महर्षी वाल्मीकी विद्यालय, ॲड. विद्या नामदेव भुजबळ, बाळासाहेब राऊत तसेच माजी विद्यार्थ्यांनी सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशनला आर्थिक मदत दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका नाजमिन अत्तार यांनी केले. शैला गवारी यांनी सूत्रसंचालन केले, तर सुदामा गायकवाड यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

12 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

18 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

18 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

19 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

19 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

19 तास ago