महाराष्ट्र

योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान केला पाहिजे; जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर

भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डेच्यावतीने संयुक्त जयंती उत्सव साजरा

सिंधुदुर्ग: योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान आणि गौरव केला पाहिजे. शिवाय, केलेले उपकार न विसरता त्यांच्याविषयी कृतज्ञ असले पाहिजे. त्याच जाणिवेने भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डे कदमवाडीचे काम विजय कदम आणि सहकाऱ्यांच्या सहकाऱ्याने सुरू आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले. ते कासार्डे कदमवाडी येथील भारतीय बौद्ध महाभेने आयोजित केलेल्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर, शाखा अध्यक्ष विजय कदम, ग्रामपंचायत सदस्य विजय राणे, संदेश पत्र संग्राहक, पत्रकार निकेत पावसकर, ड्रामा ज्युनिअर फायनलिस्ट सावी मुद्राळे, प्रा. विनायक पाताडे, शाखा उपाध्यक्ष बबन तांबे, गोपाळ पांचाळ, समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव गुणाजी जाधव, संतोष कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते भिकाजी कदम, पोलिस पाटील योगेश कदम, वैभव मुद्राळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कासार्डे कदमवाडी येथील भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने दरवर्षी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. यानिमित्त सकाळी 10 वाजता पंचशील ध्वजारोहण, त्यानंतर बुध्द पूजापाठ, 11.30 वा. धम्म प्रवचन आणि रात्रौ 9.30 वाजता अभिवादन सभा असे कार्यक्रम संपन्न झालेत.

रात्रौचा अभिवादनाचा कार्यक्रम विजय भिकाजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी विविध गुणवंत मुलांचा गौरव, कासार्डे दाबगाव चे पोलिस पाटील योगेश कदम, ड्रामा ज्युनिअर फायनलिस्ट सावी मुद्राळे, शोभा कासले, ॲड. चैतन्या तांबे यांना शाल, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

निकेत पावसकर यांना विशेष पुरस्कार

मुळचे साळीस्ते येथील असलेले आणि संदेश पत्र संग्राहक म्हणून राज्यभर परिचित असलेले निकेत पावसकर यांना भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डे च्या वतीने देण्यात येणारा विशेष पुरस्कार आनंद कासार्डेकर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि भारतीय संविधान देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना निकेत पावसकर म्हणाले की, आम्ही करत असलेल्या या आगळ्यावेगळ्या चळवळीची नोंद आपल्या माणसांकडून घेण्यात आली, ही समाधानाची बाब आहे. या संग्रहाचा आपण सर्वांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलात तर निश्चितच सांस्कृतिक आणि वैचारिक समृद्ध होऊ शकाल. या संग्रहाच्या द्वारे आम्ही मुलांच्या विकासासाठी कार्यरत आहोत. शालेय मुलांनी वेगळी वाट अनुभवावी, आपल्यातील वेगळेपण कायम टिकू द्यावे, यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी या संदेश पत्रांची प्रदर्शने आयोजित केली जातात.

यावेळी सावी मुद्राळे हिनेही मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन योगेश कदम यांनी तर आभार विजय कदम यांनी मानले. या कार्यक्रमानंतर मायंडेश्वर दशावतार नाट्य मंडळ भडगाव यांचे दैवचक्र (काल्पनिक नाटक) सादर झाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

9 मिनिटे ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago