महाराष्ट्र

राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची अंतिम आठवडा प्रस्तावात सरकारवर टीका

मुंबई: पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले की ते ठोसे देतात. जेवण चांगले मिळाले नाही म्हणून मारहाण केली असेच गळकी एसटी बघून परिवहन मंत्र्यांचे काय करायचं? निकृष्ट बांधकाम करणाऱ्या मंत्र्यांचे, दवाखान्यात औषध नाही मिळाले की आरोग्य मंत्र्याला हा न्याय लागू करायचा का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. हे ठोश्याचे राज्य झाले आहे. महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य होते पण आज आपल्या राज्याची ओळख शेतकरी आत्महत्या आणि ड्रग्समुळे होते आहे . भाजपाचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुंगटीवार म्हणाले राज्यात ११ हजार कोटींचे ड्रॅग आणि १० हजार कोटींचे सिंथेटिक ड्रग्स सापडले आहेत.हे फक्त हिमनगाचे टोक आहे, सत्ताधारी आमदार ही माहित देत आहे म्हणजे किती गंभीर स्थिती राज्यात आहे, याची कल्पना येईल.

परभणी इथे सोमनाथ सूर्यवंशी या संविधानाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणाची हत्या झाली. श्वसनाचा आजार असल्याने मृत्यू झाल्याची माहिती सरकारने सभागृहात दिली पण आता कोर्टाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, सरकार आता काय कारवाई करणार असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला.

मुंबईत Microscan आणि संलग्न कंपन्यांकडून ७०० किमी हून अधिक बेकायदेशीर ऑप्टिकल फायबर केबल टाकली, त्यात ७०० कोटींचा महसूल बुडवण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केली. प्रत्येक ठिकाणी टेंडर मॅनेज केले जात आहे. २० टक्के कमिशन दिल्याशिवाय काम होत नाही, मुख्यमंत्री साफसफाई करणार का? शालार्थ पोर्टल माध्यमातून जी शिक्षक भरती झाली त्यात घोटाळा झाला आहे.प्रत्येक शिक्षकाकडून ३० लाख घेण्यात आले पण एकाही संस्थाचालकावर कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणात नीलेश वाघमारे सूत्रधार आहे पण सरकारच्या मर्जीमुळे तो अजूनही सापडत नाही, एका मंत्र्यांची कृपादृष्टी असल्याने अभय मिळाले आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी सभेत केली. राज्यात भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे, सरकार कंगाल होत आहे मुख्यमंत्र्यांनी हा भ्रष्टाचार संपवावा अस वडेट्टीवार म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago