महाराष्ट्र

काळाघोडा कला महोत्सवात ‘तिच्या जीवनाच्या चौकटी’ शिल्पाचे सादरीकरण

मुंबई: दादासाहेब फाळके चित्रनगरीने यंदाच्या काळाघोडा कला महोत्सवात “तिच्या जीवनाच्या चौकटी” हे संकल्पनात्मक शिल्प साकारले आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारलेले हे शिल्प, सिनेमाच्या पडद्यामागे मेहनत करणाऱ्या महिलांच्या योगदानाला समर्पित आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी कलाकृतीला भेट देऊन तिच्या सौंदर्यावर आणि संदेशावर आनंद व्यक्त केला. श्रीमती म्हसे पाटील म्हणाल्या की, “प्रत्येक स्त्रीची स्वतःची कथा, संघर्ष आणि स्वप्नं असतात. जशा अनेक चौकटी मिळून एक चित्रपट घडतो, तसंच विविध अनुभवांनी जीवनाला अर्थ मिळतो.” त्यांनी यावेळी शासनाच्या स्त्रीशक्तीला सन्मान देणाऱ्या विविध योजनांचा उल्लेख केला.

कलाकृती डॉ. सुमित पाटील यांनी साकारले असून, यावेळी महामंडळाच्या मुख्यलेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे देखील उपस्थित होत्या.काळाघोडा कला महोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक योजना आणि उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी अधिक माहिती महामंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपती येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य महास्वच्छता अभियान; ५ हजार विद्यार्थी…

रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…

1 तास ago

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

23 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

2 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago