उन्हाळा आला की घाम येणे हे ठरलेले समीकरण आहे. वाढत्या उष्णतेमुळे घाम येणे ही बहुतेकांची मोठी समस्या ठरते. घामापासून वाचण्यासाठी आजकाल एसी, फॅन यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. घर, गाडी, ऑफिस सर्वत्र वातानुकूलनाची सोय असली तरी घाम येणे पूर्णपणे टाळता येत नाही. मात्र, घाम येणे हे आरोग्यासाठी घातक नसून उलट ते चांगल्या आरोग्याचे लक्षण असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
घाम येणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. घामाच्या माध्यमातून शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. घाम येणे हे कोणत्याही आजाराचे लक्षण नसून, शरीर सुरळीतपणे कार्य करत असल्याचे संकेत मानले जाते. मात्र, प्रमाणाबाहेर घाम येत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
घाम येण्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. विशेषतः उन्हाळ्यात सतत बदलणाऱ्या तापमानामुळे शरीरावर ताण येतो. अशा वेळी घामामुळे शरीर थंड राहते आणि उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच घामामधील अँटी-मायक्रोबियल घटकांमुळे विविध संसर्गजन्य आजारांपासून शरीराचा बचाव होतो.
वजन कमी करण्यासाठीही घाम येणे उपयुक्त ठरते. व्यायाम करताना शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम येतो. यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे जिम किंवा व्यायामादरम्यान येणारा घाम हा शरीरासाठी फायदेशीर मानला जातो.
नियमित घामामुळे शरीराची डिटॉक्स प्रक्रिया सुलभ होते. घामाच्या माध्यमातून शरीरातील विषारी द्रव्ये, मृत पेशी बाहेर टाकल्या जातात. याचा सकारात्मक परिणाम त्वचेवरही दिसून येतो. त्वचा अधिक तजेलदार आणि निरोगी दिसते.
एकंदरीत, घाम येणे ही शरीराची संरक्षणात्मक आणि आरोग्यदायी प्रक्रिया आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घाम येणे टाळण्याऐवजी त्याचे फायदे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र, अती प्रमाणात घाम येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे
(सोशल मीडियावरून साभार)
ओबीसी आरक्षण, मोहन भागवतांचा युवक संवाद आणि आदिवासी विभागाच्या ६०० कोटींच्या थकीत देण्यांवरही सरकारवर हल्लाबोल…
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास, परवडणारे गृहनिर्माण, स्वच्छता आणि आधुनिक पायाभूत सुविधा…
कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…
६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…
निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…