महाराष्ट्र

नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार

मुंबई: नागपुरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे. दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही पण दंगल कोणी निर्माण केली? त्याची सुरुवात कुठून झाली? या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. या दंगलीवेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली, त्यावेळी पोलीस तेथे होते. आंदोलन करताना पोलीस अशा वस्तू ताब्यात घेते पण नागपूर पोलिसांनी ती हिरवी चादर ताब्यात का घेतली नाही. ती चादर ताब्यात घेतली असती तर ही घटना झालीच नसती. नागपूरला पेटवण्यात राज्य सरकारच जबाबदार होते हे ठामपणे सांगतो, असे ज्येष्ठ नेते नाना पटोले म्हणाले.

अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, नागपूरची दंगल ज्या भागात झाली त्या भागात मुख्यमंत्री फडणवीस यांचे बालपण गेले आहे. नागपूर शहर हे सर्वधर्म समभाव मानणारे आहे. आजपर्यंत असा प्रकार नागपूरमध्ये झाला नाही. या दंगलीवेळी पोलिसांची बघ्याची भूमिका राहिली. हिरवी चादर पेटवली गेली नसती तर दंगल झाली नसती ही वस्तुस्थिती आहे, यावर गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे असे नाना पटोले म्हणाले.

कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कविता केल्याने उद्रेक झाला पण प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्याचे काय? त्यांना अटक का केली नाही. छत्रपतींच्या नावाने या दोघांनी अपशब्द वापरले, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, त्याचे उत्तर द्यावे लागले. प्रशांत कोरटकर कोणाचा हस्तक आहे, त्याचे आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. जेलमध्ये असलेल्या महेश मोतेवारची जप्त केलेली आलिशान कार त्याच्याकडे कशी? राहुल सोलापूरकर कोणाचा माणूस आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? असे संतप्त प्रश्न विचारत पाशवी बहुमताच्या आधारावर जो कारभार चालला आहे तो महाराष्ट्र पहात आहे असे नाना पटोले म्हणाले.

परभणीतील सोमनाथ सुर्यंवंशी यांच्या मृत्यूचा प्रश्न उपस्थित करत नाना पटोले म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या त्रासाने झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात सांगितले. आता जो अहवाल आला आहे त्यात सुर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे त्यात म्हटले आहे. परभणीत पोलीस लाठीहल्ल्याचे आदेश मंत्रालयातून की पोलीस महासंचालक कार्यालयातून दिले त्याचे उत्तर सरकारने द्यावे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणी मुख्यमंत्री यांनी खुलासा करावा.

राज्यात दर एक लाख लोकसंख्येमागे पोलिसांची संख्या १५५ इतकी आहे. राज्यात आज २१ हजार ८३१ पदे रिक्त आहेत ती किती दिवसात भरली जाणार आहेत. तसेच महिला पोलिसांची संख्याही कमी असून ती ३६ हजार ९०० असून हे प्रमाण केवळ १८.१० टक्के आहे. विलासराव देशमुख सरकार असताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिला पोलीस भरती योजना सुरु केली होती असेही नाना पटोले म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

3 तास ago

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…

4 तास ago

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…

4 तास ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

4 तास ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

4 तास ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

4 तास ago