महाराष्ट्र

गोष्ट भिगवणच्या लेकीची; प्रेमप्रकरणाला राजकीय व धार्मिक वळण, संवेदनशीलतेचा प्रश्न ऐरणीवर

इंदापूर (पुणे):  पुणे जिल्ह्यातील भिगवण (ता. इंदापूर) येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर आंदोलन, घोषणाबाजी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली; मात्र संबंधित तरुणीने २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर होत ती स्वतःच्या इच्छेने प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट केले आहे. तिने याबाबत प्रतिज्ञापत्रही सादर केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपहरणाची तक्रार; चार दिवसांवर लग्न

१७ फेब्रुवारी रोजी, लग्नाला अवघे चार दिवस शिल्लक असताना, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी फेकून तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. संशयित आरोपी हा शेजारी राहणारा तरुण असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत पाच ते सहा विशेष पथके तयार केली होती.

तरुणीचा जबाब; कुटुंबाचा विरोध

दरम्यान, तरुणीने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात अपहरण झाल्याचा इन्कार करत ती स्वतःहून गेल्याचे म्हटले. मात्र, तिच्या आईने हा जबाब दबावाखाली दिल्याचा आरोप केला असून मुलीला व कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा केला आहे. यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.

राजकीय आरोप; घोषणाबाजीने तापला परिसर

या प्रकरणात भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर आरोपींना पाठबळ असल्याचे आरोप नातेवाईकांनी केले आहेत. आरोपीचा चुलता हा आमदारांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात आला. न्यायालयात जबाब नोंदवण्यासाठी तरुणीला नेण्यात आले असता ‘राहुल कुल मुर्दाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आमदारांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR)ची चौकशी करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी भिगवणमध्ये भेट देत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते; मात्र पोलिसांनी मज्जाव केल्याने मोर्चा काढता आला नाही. आरोपीवर मोक्का लावण्याची मागणी करत मुलीला आईच्या ताब्यात द्यावे, असे पडळकर यांनी म्हटले.

धर्मीय रंगामुळे वाढला तणाव

तरुणी हिंदू तर संशयित मुस्लिम समाजातील असल्याने प्रकरणाला धार्मिक रंग चढला. सोशल मीडियावरही विविध पोस्ट, फोटो आणि स्टेटस व्हायरल झाल्याने वातावरण अधिक तापले. भिगवण परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त वाढवला आहे.

सन्मानाने जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

सदर तरुणी २१ वर्षांची असल्याने कायद्याने सज्ञान आहे. तिच्या इच्छेला प्राधान्य द्यावे की कुटुंबाच्या आक्षेपांचा विचार करावा, यावर चर्चा सुरू आहे. एका बाजूला मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न, तर दुसऱ्या बाजूला समाजातील दबाव, प्रतिष्ठा आणि धार्मिक भावना यांचा संघर्ष उघड झाला आहे.

या घटनेने आंतरजातीय व आंतरधर्मीय संबंधांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आंदोलन आणि राजकीय आरोपांपेक्षा तरुणीच्या सुरक्षिततेला, समुपदेशनाला आणि कायदेशीर प्रक्रियेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याची भावना सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे.पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून पुढील घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

3 तास ago

केस गळतीवर घरगुती उपाय

1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा…

3 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची लढाई पुढे नेणे हीच खरी आदरांजली; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची…

3 तास ago

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

14 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

18 तास ago

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

20 तास ago