महाराष्ट्र

नागपूर इथे झालेले हिवाळी अधिवेशन हे वांझोट, अधिवेशन विदर्भातील जनतेला मिळाल्या वाटण्याच्या अक्षता…

फक्त पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठी सात दिवसाचे अधिवेशन घेण्यात आले, विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

नागपूर: नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्यावर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.

या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले निवडणुकीत सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करण्यासाठी अधिवेशन झाले.सरकारकडून ज्या काही घोषणा झाल्या त्या मुंबई,ठाणे,नवी मुंबई यासाठी झाल्या पण विदर्भासाठी एकही घोषणा करण्यात आली नाही.त्यामुळे विदर्भातील जनतेची फसवणूक करणारे हे अधिवेशन होते अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे अधिवेशन झाले.सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले यांबाबत प्रश्न विचारूनही सरकारने कारवाई केली नाही अशी टीका सचिन अहिर यांनी केली.

विदर्भातील धान,सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी या अधिवेशनाकडे डोळे लावून बसला होता.धानाला आणि सोयाबीनला बोनस मिळावा म्हणून आम्ही मागणी केली पण सरकारने कारवाई केली नाही.राज्यातील तरुणांना. ड्रगचा विळखा आहे पण त्यावर ही कारवाईची ठोस भूमिका सरकारची नाही अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील म्हणाले या अधिवेशनात घोषणांचा नुसता पाऊस पडला. कापूस खरेदीचे केंद्र वाढवा ही मागणी केली पण त्याचा ही निर्णय झाला नाही. पैसे नाही खिशात पण घोषणा मात्र अपार अशी अवस्था महायुती सरकारची आहे. या सरकारने इतक्या घोषणा केल्या की त्यासाठी बजेट कमी पडेल अशी अवस्था आहे, अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी राज्यात गुंतवणूक येते मऊ झाले याबाबत सभागृहाला माहिती दिली पण ज्यांच्याबरोबर करार झाले त्या कंपन्या राज्यात येत नाही,प्रत्यक्षात गुंतवणूकच झालेली नाही त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली.विरोधी पक्षाने राज्यातील कायदा सुव्यवस्था बाबत प्रश्न उपस्थित केले त्यावर ठोस उत्तर मिळाले नाही त्यामुळे सात दिवसात जनतेच्या पदरी निराशाच आली अशी टीका जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी सभागृहात आक्रमकता दाखवत प्रश्न उपस्थित केले पण सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिली नाही अस शशिकांत शिंदे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago