महाराष्ट्र

युवा पिढी बिघडलेली नाही; संवादाची भाषा बदलली; डॉ. नीलम गोऱ्हे

‘जनरेशन Z’ ला दोष नको; समजून घेणे गरजेचे; विश्वास नांगरे पाटील

नाशिक: चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात “मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग” या विषयावर विशेष व्याख्यान सत्र उत्साहात पार पडले. या सत्रात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी युवा पिढीशी थेट संवाद साधत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास अॅड. नितीन ठाकरे, शामकांत देवरे (संचालक, राज्य मराठी विकास संस्था), नामदेव भोसले (सहसचिव, मराठी भाषा विभाग), संवादक अभिजीत ब्रह्मनाथकर आणि सूत्रसंचालक कीर्ती पेंढारकर उपस्थित होते. यावेळी डॉ. गोऱ्हे यांचा सत्कार किरण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

संवादाची परिभाषा बदलली

डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की आजची युवा पिढी बिघडलेली नसून तंत्रज्ञान आणि बदलत्या सामाजिक संदर्भांमुळे तिच्या संवादाची पद्धत बदलली आहे. भाषा काळानुसार बदलत असते; त्यामुळे शुद्धतेचा अति आग्रह धरण्यापेक्षा भावार्थ समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाईल हे वरदान असले तरी त्याचा अतिरेक घातक ठरू शकतो. युवकांनी कोणती माहिती स्वीकारायची आणि कोणती नाकारायची याचा सजग निर्णय घ्यायला हवा. “मिसळ चालेल, पण भेसळ नको,” असे सांगत त्यांनी सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.

एकत्रित कुटुंब पद्धती कमी होत असल्याने पालक-मुलांमधील संवाद घटत आहे. अभ्यासासोबत क्लासेसचा ताण, घरातील लोकशाहीचा अभाव आणि निर्णयस्वातंत्र्याची कमतरता या बाबी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. अति लाड आणि अवास्तव अपेक्षा यामुळे नैराश्य वाढू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘जनरेशन Z’ क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह

विश्वास नांगरे पाटील यांनी ‘जनरेशन Z’ ला दोष देण्याऐवजी समजून घेण्याची गरज व्यक्त केली. आजची पिढी टेक्नोसॅव्ही, क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह असून समाजातील बदलांचे प्रतिबिंब तिच्या वर्तनात दिसते, असे त्यांनी सांगितले.

प्रशासनात मराठी भाषेचा वापर वाढत असल्याचे नमूद करत त्यांनी पोलीस दलाचा संदेश हा केवळ शक्तीचा नसून शिस्त आणि मूल्यांचा असल्याचे अधोरेखित केले. युवकांनी शरीर आणि मन दोन्ही सुदृढ ठेवावे. “शब्दांमधून विचार, विचारांतून कृती आणि कृतीतून चारित्र्य घडते,” असा संदेश त्यांनी दिला.

परिसंवादातून युवा पिढीची बौद्धिक आणि श्रमशक्ती ही भारताची ताकद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मराठी भाषा आणि संस्कृती जागतिक स्तरावर समर्थपणे पुढे नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago