महाराष्ट्र

महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीत तुकडेबंदी नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

औरंगाबाद: महत्वाचा निर्णय* महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या हद्दीत तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही. असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यस्तरीय सेवा पंधरवडा अभियानावेळी जाहीर केला.

काय सांगितलं महसूलमंत्र्यांनी

तुकडेबंदी कायद्यातील तरतुदींविरोधात पडलेल्या तुकड्यांचे नियमितीकरण सुलभ केले जाणार.

कार्यपद्धती पुढील १५ दिवसांत जाहीर होईल.

या निर्णयामुळे राज्यातील ५० लाख नागरिकांना फायदा होणार.

थांबलेले व्यवहार पूर्ण होतील आणि दस्तांची नोंदणी सुलभ होईल.

समितीची स्थापना

महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व एकत्रीकरणासाठी १९४७ च्या अधिनियमानुसार शासनाने ९ सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

अध्यक्ष; महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव

उद्दिष्ट;  तुकड्यांचे नियमितीकरणाची प्रक्रिया ठरवणे

कुठे लागू नाही तुकडेबंदी कायदा

महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीची हद्द

प्राधिकरण व प्रादेशिक आराखडा (RP) लागू क्षेत्रे

निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक व अकृषिक जमिनी

गावांच्या हद्दीपासून २०० मीटरपर्यंतचे क्षेत्र

नवी पद्धत – जमिनीची मोजणी बंधनकारक

कर्नाटक, आंध्रप्रदेशच्या धर्तीवर १०-१५ खासगी भूकरमापक एजन्सी नियुक्त केल्या जाणार.

जमिनीची मोजणी झाल्याशिवाय दस्ताची नोंदणी होणार नाही.

दस्ताची नोंदणी झाल्यावरच फेरफार प्रक्रिया केली जाणार.

ही नवी प्रक्रिया येत्या महिन्याभरात लागू होईल.

या निर्णयामुळे अनेक वर्षे अडकलेले जमिनीचे व्यवहार सुटणार आहेत आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

10 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

11 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

12 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

12 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

12 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

12 तास ago