महाराष्ट्र

टाटा कार खरेदीचा विचार करताय? १ सप्टेंबरपासून गाड्या महागणार; २५ हजारांपर्यंत वाढ

मुंबई : टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होणार आहे. पेट्रोल-डिझेलसोबतच इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ही दरवाढ येत्या १ सप्टेंबर २०२६पासून लागू होणार असून, विविध मॉडेल्सच्या किमतीत २५ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वाढता उत्पादन खर्च आणि महागाईचा सातत्याने असलेला दबाव यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढलेल्या खर्चाचा संपूर्ण भार ग्राहकांवर टाकला जाणार नसून, त्यातील काही हिस्सा कंपनी स्वतः उचलणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाढत्या कच्च्या मालाच्या किमतींचा दबाव

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्र यांनी वाहन उद्योगासमोरील आव्हानांवर भाष्य केले. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उद्योगासाठी चालू वर्षाची पहिली सहामाही आव्हानात्मक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानंतर कंपन्या तातडीने त्याचा संपूर्ण भार ग्राहकांवर टाकत नाहीत. सुरुवातीला अंतर्गत खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, खर्चाचा दबाव कायम राहिल्यास टप्प्याटप्प्याने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

२०२६ मधील टाटाची तिसरी दरवाढ

विशेष म्हणजे, २०२६ मध्ये टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या किमतीत होणारी ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी १ एप्रिल २०२६ रोजी पेट्रोल-डिझेल वाहनांच्या किमतीत ०.५ टक्क्यांपर्यंत, तर १ जुलै २०२६ रोजी प्रवासी वाहनांच्या किमतीत १.५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती.

ह्युंदाईकडूनही दरवाढीची घोषणा

दरम्यान, ह्युंदाई मोटर इंडियानेही सप्टेंबरपासून आपल्या वाहनांच्या किमतीत १ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले आहे.त्यामुळे टाटा आणि ह्युंदाईनंतर इतर वाहन कंपन्यांकडूनही दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

7 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

10 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

10 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

11 तास ago