आरोग्य

रात्री लवकर जेवणाचे फायदे

मानवाच्या आहाराची रचना विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. नास्तापासून डिनरपर्यंत खाण्याचा विशिष्ट वेळ असतो. त्यावेळेच खाल्लामुळे शरीराला चांगला फायदा होतो. अनेक जण रात्रीचे जेवण उशिरा करतात. परंतु अनेकांना माहीत नाही की संध्याकाळी सूरज मावळल्यावर काही खाल्ले जात नाही. आयुर्वेदमध्ये म्हटले आहे की, सूर्यादयानंतर आणि सूर्यास्तपूर्व जेवण करणे कधीही चांगले आहे. त्यावेळी घेतलेले भोजन शरीरासाठी सर्वाधिक फायदेशीर असते. परंतु लोकांना रात्री उशिरा जेवण करण्याची सवय झाली आहे. अनेक जण रात्री 9-10 वाजता जेवण करतात. ते आरोग्यासाठी चांगले नाही. लवकर जेवण केल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो अन् दुसरे अनेक फायदे मिळतात.

नास्ता सकाळी उठल्यानंतर दोन तासांत केले पाहिजे. दुपारचे जेवण 1 ते 2 वाजे दरम्यान केले पाहिजे. संध्याकाळचे जेवण 7 वाजेपूर्वी केले पाहिजे. कधी उशीर झाला तर 8 पर्यंत संध्याकाळचे जेवण करत येईल. वजन कमी होणार- तुम्ही लवकर जेवण केल्यावर शरीर त्या जेवणाचा चांगला वापर करतो. त्यामुळे शरीरात मेटाबोलिज्म निर्मितीचा वेग वाढतो. जेवण सहज पचते आणि शरीराला नवीन उर्जा मिळते. लवकर जेवल्यामुले कॅलरी बर्न होते, त्यामुळे वजन कमी होते.

पचन चांगले होणार: जेव्हा तुम्ही झोपणे आणि जेवणा दरम्यान विशिष्ट गॅप ठेवतात, तेव्हा जेवण सहज पचते. परंतु रात्री उशिरा जेवल्यामुळे जेवण पचत नाही. त्यामुळे पोट दुखी, गॅस, पोटावर सूज येणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

मधूमेहसाठी फायदेशीर: मधूमेह म्हणजे डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी वेळेवर जेवण करणे आवश्यक असते. मधूमेहाच्या रुग्णांनी लवकर जेवण केल्यावर शरीरात ग्लूकोज बनवण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल. उशिरा जेवण करणे डायबिटीजच्या रुग्णांसाठी चांगले नाही.

झोपेत सुधारणा होणार: पचनक्रिया जेवणानंतर सुरु होते. परंतु तुम्ही जेव्हा उशिरा खातात आणि झोपतात, तेव्हा पचनक्रिया सुरळीत होत नाही. त्यामुळे झोपेत अडथळे येतात. वेळेवर जेवण केल्यामुळे पचन चांगले होते आणि झोप चांगली लागते.

हृदयाच्या आरोग्यामध्ये सुधारणा: बऱ्याच वेळा, उशीरा खाल्ल्याने अन्न पचणे कठीण होते, ज्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते. या परिस्थितीत पोटात गॅस ॲसिडिटी होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. म्हणूनच डॉक्टर नेहमी वेळेवर खाण्याचा सल्ला देतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

7 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

7 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

11 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

11 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

11 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

11 तास ago