मुख्य बातम्या

टाकळी हाजीत अज्ञात व्यक्तीने कांद्याचाळ पेटविल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुरच्या बेट भागातील टाकळी हाजी गावातील टेमकरवस्ती येथे गुरुवार (दि 1) रोजी दुपारी 4 च्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने येथील एका शेतकऱ्याची कांदाचाळ पेटविल्याने लाखोंचे नुकसान झाले असुन याबाबत सुभाष संभाजी भोसले (वय 55) टेमकर वस्ती, टाकळी हाजी ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष भोसले हे टाकळी हाजी येथे टेमकर वस्ती येथे राहत असुन त्यांनी कांदाचाळीत विक्रीसाठी साठवलेला कांदा गुरुवार (दि 1) रोजी दुपारी 4 च्या सुमारास कोणतरी अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या उद्देशाने पेटवून दिल्याने त्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी शिरुर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दाखल केली असुन या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार मांडगे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago