वर्षा उसगावकरांनी सांगितली कुणालाही माहीत नसलेली गोष्ट
मुंबई: वयाच्या पन्नाशीतही एव्हरग्रीन दिसणाऱ्या मराठी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना मराठीतल्या वंडर गर्ल असा टॅग दिला गेला. त्यांनी एकेकाळी मराठी इंडस्ट्रीवर राज्य केलं.
आताही वर्षा मराठी मालिकांमध्ये सक्रीय आहेत. त्या अनेक वर्षांपूर्वी ‘दुनियादारी’ चित्रपटात दिसल्या होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रत्येक टॉपच्या मराठी आणि हिंदी अभिनेत्यांसोबत काम केलंय. त्यांनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतही अनेक चित्रपटात काम केलं. एका मुलाखतीत वर्षा यांनी लक्ष्मीकांत यांच्या मनातली ती इच्छा सांगितली जी कधीही पूर्ण झाली नाही.
वर्षा बोलताना म्हणाल्या, ‘मला वाटतं आज लक्षा असता तर तो एका वेगळ्या पद्धतीने चमकला असता. त्याचं अकाली निधन झालं असं म्हणेन मी. लक्षाबरोबर मी ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट केलेला. त्याच्या आधी कसं आहे, लक्षा म्हणजे कॉमेडी कॉमेडी आणि कॉमेडी. लक्ष्याला ती खंत होतीच की माझा एक वेगळा पैलूपण प्रेक्षकांना दिसला पाहिजे. जब्बार पटेलांनी हा चित्रपट त्याला दिला. तेव्हा लक्ष्याचा मला फोन आला आणि तो म्हणाला की या चित्रपटात मला तू हवी आहेस. तू हा चित्रपट कर. भले तुला मानधन कमी देतील. स्त्री प्रधान हा चित्रपट नसेल पण तू हा चित्रपट करावास अशी माझी इच्छा आहे. मीदेखील तो चित्रपट केला.
वर्षा पुढे म्हणाल्या, ‘लक्ष्याने ज्या पद्धतीने त्यात काम केलंय ते मला खूप टचिंग वाटलं. तो त्याचे सीन नसला तरी तिथे हजर असायचा. एक वेगळा लक्ष्या मला तिथे दिसला. त्या चित्रपटासाठी त्याला पुरस्कार मिळायला हवा होता. मला असं वाटलं की त्याने अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स केला होता. पण त्या वर्षीचा अवॉर्ड त्याला मिळालं नाही. त्याला खूप वाईट वाटलं. त्याला कायम ती खंत वाटत राहिली की या चित्रपटासाठी मला अवॉर्ड मिळायला पाहिजे होता. आणि खरंच मलाही असं वाटतं की त्याला ते अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं. ते जर त्याला मिळालं असतं तर त्याच्या अभिनयाला एक वेगळा पैलू पडला असता. त्याच्या त्या विनोदी अभिनेत्याच्या चौकटीतून तो बाहेर आला असता. वर्षा यांनी यापूर्वी ”बिग बॉस मराठी ३” मध्ये सहभाग घेतला होता. सोबतच त्या ‘सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत दिसल्या होत्या.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…