महाराष्ट्र

समाजातील वंचितांना “शैक्षणिक साहित्य” वितरण करून साजरा करणार विजयादशमी

मुंबई: (धम्मचक्र प्रवर्तन दिन) आता फक्त ऐतिहासिक स्मरणापुरता न राहता, तो सामाजिक बांधिलकीचा दिवस ठरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे आणि मिठाई वाटून हा दिवस साजरा करण्याचे आवाहन ‘एक वही एक पेन अभियान’च्या वतीने करण्यात आले आहे.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात लाखो अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेला स्मरण करून देत,एक वही एक पेन अभियानाचे प्रणेते,

पत्रकार राजू झनके यांनी सांगितले,की, “सम्राट अशोकाने धम्मचक्र गतिमान केले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर कळस चढविला. त्यांनी समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिला. आजही वंचित, उपेक्षित समाजातील अनेक कुटुंबांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण जाते, अशा स्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी साहित्य पुरवणे ही खरी बाबासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल.”

या पार्श्वभूमीवर येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी समाजातील बांधवांना शैक्षणिक साहित्य, मिठाई आणि कपडे वाटून धम्मचक्र प्रवर्तन दिन दिवाळीप्रमाणे साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एक वही एक पेन अभियानच्या वतीने उद्या मुंबई तील मानखुर्द पूर्व, पंचशील बुध्द विहार येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.“दहा धम्मबांधवांपैकी किमान एका बांधवाने जरी एखाद्या विद्यार्थ्याला एका वर्षासाठी शैक्षणिक साहित्य पुरवून दत्तक घेतले, तरी बाबासाहेबांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल,” असे झनके म्हणाले.

धम्म चक्र प्रवर्तन दिनी दादर चैत्यभूमी,नागपूरची दीक्षाभूमी ,महू येथील जन्मभूमी तसेच देशात ठिकठिकाणी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच बुध्दविहारांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात .यावेळी डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना, हारफुलांऐवजी वह्या पेन, स्पर्धा परीक्षांची पुस्तके आदी शैक्षणिक साहित्यांची आदरांजली अर्पण करावी असे आवाहन एक वही एक पेन अभियानचे प्रणेते, पत्रकार राजू झनके यांनी केले आहे.जमा झालेले हे साहित्य समाजातील वंचित आर्थिक दुर्बल तसेच पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना वितरित करावे. शिक्षणाच्या या वाटचालीसाठी सर्व धम्मबांधवांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

18 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

18 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

18 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago