महाराष्ट्र

तुमच्या नंतर संपत्तीचा खरा मालक कोण? नॉमिनी की उत्तराधिकारी; जाणून घ्या फरक…

संभाजीनगर: मालमत्तेची खरेदी, बँक खाते किंवा पॉलिसी खरेदी करताना तुम्हाला एखाद्याला नॉमिनी बनवण्यास सांगितले जाते. तुमच्या नंतर संबधीत खात्यातून किंवा पॉलिसी इत्यादीमधून पैसे काढण्याचा अधिकार फक्त नॉमिनीलाच मिळतो. पण तुमचा नॉमिनी उत्तराधिकारी असावा असे नाही. कारण बरेच लोक नॉमिनी आणि उत्तराधिकारी एकच मानतात. पण यामध्ये फरक असू शकतो.

नॉमिनी कोण असतो?

जेव्हा तुम्ही एखाद्याला मालमत्ता किंवा गुंतवणुकीशी संबंधित कोणत्याही योजनेत नॉमिनी बनवता तेव्हा त्याला तुमच्या मृत्यूनंतर त्या पॉलिसीच्या मालमत्तेवर किंवा पैशावर दावा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. पण केवळ नॉमिनी होऊन त्याला मालकी हक्क मिळत नाहीत. जर बँक खातेदार, विमाधारक किंवा मालमत्तेच्या मालकाने कोणतेही मृत्युपत्र केले नसेल, तर त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनी त्याच्या मालमत्तेवर किंवा पॉलिसीवर दावा करेल, परंतु त्यात कोणताही वाद नसेल तरच ती रक्कम नॉमिनीला दिली जाऊ शकते. जर मृत व्यक्तीचे वारस असतील तर ते त्यांच्या हक्कासाठी त्या रकमेवर किंवा मालमत्तेवर दावा करू शकतात. या प्रकरणात मालमत्तेची रक्कम किंवा भाग सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान प्रमाणात विभागला जाईल.

उत्तराधिकारी कोण असतो?

उत्तराधिकारी म्हणजे ज्याचे नाव मालमत्तेच्या वास्तविक मालकाने कायदेशीर मृत्युपत्रात लिहिलेले असते किंवा उत्तराधिकाराच्या कायद्यानुसार त्याचा मालमत्तेवर अधिकार असतो. एखाद्या मालमत्तेच्या किंवा रकमेच्या मालकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी निश्चितपणे त्याचे पैसे काढून घेतो, परंतु त्याला ही रक्कम ठेवण्याचा अधिकार नाही. ही रक्कम त्याला त्याच्या वारसांकडे सोपवावी लागते. जर नॉमिनी व्यक्ती त्या वारसांपैकी एक असेल तर त्याला मालमत्तेचा हिस्सा किंवा पैशाचे वितरण मिळण्याचा अधिकार आहे. तुमच्या मृत्यूनंतर इच्छित नॉमिनी तुमच्या संपूर्ण मालमत्तेचा मालक असावा असे तुम्हाला वाटत असेल, तर मृत्यूपत्रात त्याचे नाव स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.

वर्ग – १ आणि वर्ग – २ उत्तराधिकारी

वर्ग -१ वारसांना प्रथम रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार आहे. हा पैसा त्यांच्यात समान वाटला पाहिजे. परंतु वर्ग-१ वारसांपैकी कोणीही नसल्यास, वर्ग-२ वारसांमध्ये विभाजन केले जाते.

वर्ग १ श्रेणीमध्ये मुलगा, मुलगी, विधवा पत्नी, आई येतात.

वर्ग २ श्रेणीमध्ये वडील, मुलगा आणि मुलगी, भाऊ, बहीण, भावाची मुले आणि बहिणीची मुले येतात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

13 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

1 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago