महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना अपात्र करणारे लाडके भाऊ मतं परत करणार का

शिवबंधन या कार्य अहवालाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शिवबंधन या कार्य अहवालाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून अंबादास दानवे उत्तम काम करत असल्याची प्रशंसा उद्धव ठाकरे यांनी केली.

अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत. शिवसेनेत एकच लाल दिवा मिळाला आहे तो दानवे यांच्याकडे आहे. सरकार सत्तेत येईन आणि आपल्याला लाल दिवा मिळेल, असे अपेक्षित असताना तसे घडले नाही मात्र आपल्याकडे असलेला एकच लाल दिवा सर्वांना भारी आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रशंसा केली. या कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार, माजी नगसेवक, उपनेते, सचिव, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, माजी नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

लाडक्या बहिणींना अपात्र करणारे लाडके भाऊ मतं परत करणार का, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

लाडक्या बहिणींना अपात्र करणारे लाडके भाऊ मतं परत करणार का असा हल्लाबोल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना केला.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे रेनकोट घालून स्नान करायचे अशी टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभ मेळ्यात गंगेत पूर्ण कपडे घालून स्नान करतात, अशी खिल्ली त्यांनी उडविली. तसेच सतत हिंदुत्वावरून टीका करणाऱ्यांचा ठाकरे यांनी मी भाजपला सोडलं हिंदुत्ववादाला नाही अशा शब्दांत समाचार घेतला. शिवसेनेचे खासदार फोडण्यावरील बातमीवरून ही त्यांनी शिंदेंना सर्व यंत्रणा बाजूला ठेवून आणि कोणताही दबाव न आणता पक्ष फोडुन दाखवा, असे आवाहन देखील केले.

मुख्यमंत्री पद, मंत्री पदे, पालकमंत्री पद यावर सत्ताधाऱ्यांच्या सुरू असलेल्या खेचाखेचीवरूनही त्यांनी चिमटा काढला. बांगलादेशी नागरिकांना राज्यात रेशनकार्ड उपलब्ध होत असल्यावरून टीका केली. तसेच लोकसंख्या पेक्षा मतदार वाढले कसे यावर प्रश्न उपस्थित करत त्यांना वगळता येणं आता शक्य नसल्याचे म्हणत त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

आमच्या पंतप्रधान यांना इतिहास आणि अभ्यासाच वावडं आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या भाषणावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली. अंबादास दानवे यांच्या कार्य अहवालच्या मुख पृष्ठावर त्यांचेच मनगट आहे, तर काही लोकांना शिवबंधन बांधण्यासाठी मनगट भाड्याने घ्यावे लागतात, अशी टीका राऊत यांनी पक्ष सोडून केलेल्यांवर केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

10 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

10 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

10 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

10 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

16 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

17 तास ago