मुंबई: दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी “दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषद” यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद होत असून या परिषदेस त्या उपस्थित राहणार आहेत. ही परिषद शुक्रवार, (दि. २८) फेब्रुवारी २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे.
या परिषदेचे उद्दिष्ट दिव्यांगांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित धोरणे, कायदे आणि योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि चर्चा करणे आहे. कल्याणकारी योजनांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रक्रिया सुलभ करणे, सेवा वितरणात सुधारणा करणे आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये आपली बाजू मांडणे हे या परिषदेचे प्रमुख विषय आहेत.
या परिषदेत महाराष्ट्र शासनातील विविध विभागातील अधिकारी, शाळा, आरोग्य, रुग्णालय, शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, दिव्यांगांसाठी संस्था, संघटना सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम मोफत असून पूर्वनोंदणीसाठी गुगल फॉर्म https://chavancentre.org/ वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ९८६७१ ५५३४५ या नंबरवर संपर्क करू शकता. या परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…