नागपूर: राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना, या भागातील संत्री पिकावर ‘कोळशी’ या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. विदर्भात अधिवेशन सुरु असताना या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.
विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. संबंधित मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे समाधानकारक मिळालेले नाही, याबद्दल मिटकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ओळींचा दाखला देत राज्यसरकारचे कान टोचले. या भागातील फलोत्पादक शेतकऱ्याला नुकसान भरपाई किती मिळाली, कृषी विभागाने कोणतीही तपासणी केलेली नाही ही तपासणी कधीपर्यंत होईल, या नुकसानीला निकष काय लावले, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय करणार, असे प्रश्न उपस्थित करुन अमोल मिटकरी यांनी विदर्भातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…