मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली. शिंदेंच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.शिंदे गटाच्या मंत्र्यांना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी माहिती देण्यात आली नव्हती.
एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याविषयी माध्यमांना देखील कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना खासदारांशी संवाद साधून रणनीती ठरवणार असल्याचं बोललं जात आहे. पावसाळी अधिवेशनात सुरु असलेल्या घडामोडींवरही चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीच्या प्रतिमेला धक्का?
सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गेल्या काही दिवसांत चर्चेत होते. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. गायकवाड यांच्या मारहाणीमुळे विरोधकांनी टीकास्त्र सोडलं होतं. तर मंत्री संजय शिरसाट यांचेही बेडरुममधील पैशांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे महायुती सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा होती.
महायुतीतही धुसफूस असल्याचीही जोरदार चर्चा आहे. काही भाजप आमदारांकडून शिंदे गटाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. तर नगरविकास विभागाकडून निधीवाटपासाठी शिंदे गटाच्या मतदारसंघाना प्राधान्य दिलं जात असल्याची ही तक्रार काही भाजप आमदारांनी केली आहे. या तक्रारीनंतर फडणवीसांनी सर्व प्रस्तावांना अंतिम मंजुरी ही त्यांच्या देखरेखीखाली करावी, असे निर्देश दिले.
एकनाथ शिंदे त्यांची प्रतिमा राखून आहेत. तसेच लोकांशी दांडगा जनसंपर्क राखून आहेत. दुसरीकडे त्यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या शासकीय निर्णयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळे पडद्यामागे अंतर्गत तपास सुरु असल्याचाही चर्चा रंगू लागल्या आहेत.
मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…