मुख्य बातम्या

Video; मांडवगण फराटा जि. प. शाळेच्या हद्दीत गाळे; गाळेधारक व पोलिसांत तणाव

न्हावरे (तेजस फडके) मांडवगण फराटा येथे गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सुरु असलेले गाळे हे जिल्हा परिषद शाळेच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट होताच, शनिवारी त्या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. प्रशासनाकडुन कारवाईची शक्यता लक्षात घेत गाळेधारकांनी विरोध केला. तर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

या वेळी गाळेधारक व पोलिस यांच्यात काही काळ शाब्दिक चकमकही झाली. अनेक गाळेधारकांनी आपली आर्थिक गुंतवणूक व दिर्घकाळ चालवलेला व्यवसाय लक्षात घेऊन गाळ्यांचे पुनर्वसन किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, ग्रामस्थांतुनही या कारवाईबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी शाळेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या भूमिकेचं समर्थन केल. तर काहींनी अचानक केलेल्या हालचालींवर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी स्थानिक प्रशासन पुढील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Video; स्थानिक गुन्हे शाखा करतेय अवैध धंद्यावर कारवाई;परंतु शिरुर उपविभागीय कार्यालयाला कसलीच चिंता नाही

शिरुर; कंपनी फसवणुक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने बाप-लेकीचा जामीन फेटाळला

करडे येथील बाप-लेकीला अटक करण्यास पोलिसांकडुन टाळाटाळ की वरिष्ठ अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

7 तास ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

9 तास ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

9 तास ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

14 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

1 दिवस ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

1 दिवस ago