राजकीय

‘डिक्की’ने नवउद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य करावे

मुंबई: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्टँड अप इंडिया’ या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी ‘डिक्की’तर्फे स्वावलंबन संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. देशहितासाठी नवीन उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) तर्फे ‘स्टँड अप इंडिया’अंतर्गत स्वावलंबन संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डिक्कीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, वेलिंगकर संस्थेचे समूह संचालक डॉ. उदय साळुंखे, सोहनलाल जैन, डिक्कीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव दांगी, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे उपस्थित होते. माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनुसूचित जाती-जमातीच्या घटकातील नवीन उद्योजक निर्माण व्हावेत. यासाठी डिक्कीने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योजक निर्मितीसाठी नवीन धोरण तयार करून संबंधित प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. समाजात सकारात्मक विचारसरणीतून समान संधी कशी देता येईल यावर डिक्की अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. व्यक्तीला संधी दिली तर कर्तृत्व लक्षात येते. त्यामुळे व्यक्तीला संधी देणे आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘स्टँड अप इंडिया’अंतर्गत राज्याला दिलेले उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढील दोन वर्षाचे नियोजन करुन कृती कार्यक्रम तयार करावा. राज्य शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे महत्वाचे असते ते कार्य डिक्की करत आहे.

देशातील ५५ टक्के नागरिकांचे बँकेत खाते नव्हते, तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते सुरु करण्याची संकल्पना मांडली आणि त्याचा फायदा डीबीटीच्या माध्यमातून लोकांना मदत करण्यासाठी होत आहे. तंत्रज्ञान विकसित करून यंत्रणा तयार केली पाहिजे. त्याला कमी कालावधीत गती मिळते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कांबळे म्हणाले, ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील उद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया ही योजना सुरु केली आहे. योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याची मुदत ही 2025 पर्यत आहे. या योजनेत महिलांचे उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत.’

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

14 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

14 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

14 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

14 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

15 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

15 तास ago