राजकीय

अजित पवार यांना धक्का! डॉ. अमोल कोल्हे यांचे ट्विट आले चर्चेत…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेले असून, रविवारी (ता. २) राजभवनात 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे.

राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांच्यात फूट पडली आहे. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांचे ‘मी साहेबांसोबतच’ हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे. राजभवनात रविवारी (ता. २) झालेल्या शपथविधी सोहळ्याला डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. आता त्यांनी अजित पवार यांनाच मोठा धक्का दिला आहे. त्यांनी मी पवारसाहेबांसोबतच म्हणत ट्विट केले आहे.

साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते धोरण. सगळं विसरायचं पण बाप नाही विसरायचा. त्याला नाही विसरायचं असं म्हणत अमोल कोल्हेंनी ट्विट केलं. जेव्हा बुद्धी आणि अंतःकरणात द्वंद्व होतं तेव्हा आपल्या मनाचं ऐका. कदाचित बुद्धी कधी कधी नैतिकता विसरते… पण मन कधीच विसरत नाही असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते. मात्र आज हे तीनही आमदार शरद पवार यांच्यासोबत दिसून येत आहेत.

शिरूरकरांची प्रतिक्रिया! आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यासोबत आज बसण्याची वेळ आली…

शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात…

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

16 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

17 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

17 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago