आरोग्य

सावधान,डेंग्यूचं वाढतंय प्रमाण, पहा डेंग्यू होण्याची कारणे

डेंग्यू कशाने होतो 

फ्लॅव्हिव्हायरस परिवारातील विषाणूमुळे होणारा डेंग्यू ताप हा एडिस एजिप्ती या प्रकारच्या डासाच्या मादीपासून फैलावतो. हे विषाणू डेंग्यू -१ ते डेंग्यू -४ अशा चार उपजातींत विभागले आहेत. म्हणूनच एकदा डेंग्यू ताप एका उपजातीच्या विषाणूमुळे होऊन गेला तरी तो दुसऱ्या उपजातीचा विषाणू परत होऊ शकतो.

एडिस एजिप्ती या डासांचे आयुष्य साधारणपणे ४ आठवडे असते. हे डास १०० ते २०० मीटर अंतरापर्यंत उडत जाऊ शकतात. त्यांच्या पाठ व पायावर पांढऱ्या रंगाचे पट्टे असल्याने त्यांना टायगर माॅस्क्युटो, असेही म्हटले जाते. घरात अंधाऱ्या जागी तसेच घराबाहेर थंड व अंधाऱ्या जागेतही त्यांचे वास्तव्य असते. अंडी, अळी, कोष व पूर्ण डास या त्यांच्या जीवनचक्राच्या अवस्था असतात. त्यापैकी पहिल्या तीन अवस्था पाण्यामध्ये असतात.

या डासांची उत्पत्ती साठवलेले स्वच्छ पाणी उदा. रांजण, हौद, पाण्याचे मोठे बॅरल, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, कुलर्स, कारंजी, फुलदाण्या इ. ठिकाणी होते. निरुपयोगी वस्तूंमध्ये साठलेले स्वच्छ पाणी उदा. नारळाच्या करवंट्या, डबे, बाटल्या, प्लास्टिकची भांडी, रिकाम्या कुंड्या, टायर अशा ठिकाणीही या डासांची पैदास होते.

डेंग्यू तापाच्या रुग्णास डासाची मादी चावल्यास तिच्या शरीरात तापाचे विषाणू प्रवेश करतात. साधारणत: ८ ते १० दिवसांत पूर्ण वाढ झाल्यावर हा दूषित डास निरोगी व्यक्तीला चावला तर त्यालाही डेंग्यू ताप येऊ शकतो. एकदा दूषित झालेला हा डास मरेपर्यंत दूषित राहतो.

डेंग्यूच्या विषाणूंमुळे प्लेटलेट घटतात. त्यामुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो व रक्तस्राव सुरू होतो, तसेच रक्तवाहिन्यांना गळती लागते व रक्तातील पाणी रक्तवाहिन्यातून बाहेर पडते त्यामुळे रुग्ण शाॅकमध्ये जाऊ शकतो.

सर्वसाधारण डेंग्यू ताप:- यात थंडी भरून ताप येतो, डोके दुखते, सांधे व अंग दुखते, डोळ्याचे स्नायू दुखू लागतात. खांदे, कोपरा, मनगट, गुडघा, घोटे, लहान सांधे दुखायला लागतात. हालचाल मंदावते. पोटात दुखणे, उलट्या होणे, भूक मंदावणे अशी लक्षणेही दिसू लागतात.

सात ते आठ दिवसानंतर लक्षणांची तीव्रता कमी होऊ लागते. आजार साधारणपणे दहा दिवस राहतो.

हेमोरेजिक डेंग्यू फिव्हर:- एकदा डेंग्यूची बाधा झाल्यानंतर परत दुसऱ्या उपजातीच्या विषाणूमुळे बाधा झाल्यास डेंग्यू तापाचा हा प्रकार दिसून येतो. सर्व अंगावर लालसर पुरळ उमटणे, नाकातून व हिरड्यातून रक्त येणे, रक्ताची उलटी होणे, शौचावाटे रक्त जाणे ही लक्षणे दिसून येतात. सगळ्यात धोकादायक म्हणजे मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो.

डेंग्यू शाॅक सिंड्रोम:- नाडीने ठोके तसेच नाडी क्षीण व्हायला लागते, रक्तदाब घटतो. शरीरात रक्तपुरवठा नीट होत नाही. नीट उपचार केले नाहीत तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

फ्ल्यू किंवा इन्फ्ल्यूएन्झा तापामध्ये देखील ताप, सर्दी, अंग दुखणे इत्यादी लक्षणे दिसतात. डेंग्यू तापाची लक्षणेही याहून वेगळी नसल्याने निदान करणे कठीण होते. अंग खूप दुखणे, हाडापर्यंत ताप गेल्यासारखा वाटणे, अंगावर लालसर पुरळ दिसणे, शरीरातील विविध भागांतून रक्तस्राव होणे अशी लक्षणे आढळल्यास मात्र डेंग्यू तापाची शंका येते.

हा आजार अतिसूक्ष्म विषाणूंमुळे होत असल्याने ते मलेरियाच्या पॅरासाइट्स रक्तात दिसत नाहीत. त्यामुळे साध्या चाचण्यांनी निदान करणे कठीण असते. खात्री करण्यासाठी डेंग्यू फिव्हर ॲण्टीबाॅडीजची चाचणी करावी लागते. संशयित रुग्णाच्या रक्ताची स्थानिक स्तरावर डेंग्यू रॅपिड टेस्टद्वारे तपासणी करता येते. अशा रुग्णांमध्ये प्लेटलेटस्चे प्रमाण कमी, पांढऱ्या पेशीचे प्रमाण कमी, तसेच वाढलेले हिमॅटोक्रिट असते.

उपचार काय असतात?

डेंग्यूवर निश्चित असे उपचार नाहीत. इतर विषाणूजन्य आजाराप्रमाणेच डेंग्यू तापाचा उपचार लक्षणांवर अवलंबून असतो. भरपूर पाणी पिणे, विश्रांती घेणे, हलका व समतोल आहार या बाबी उपचारामध्ये महत्त्वाच्या असतात. तापासाठी पॅरासिटामाॅल द्यावे लागते. गंभीर रुग्णांना हाॅस्पिटलमध्ये भरती करून डाॅक्टरांच्या देखरेखीत उपचार करावे लागत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

4 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

4 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

5 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

20 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

20 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

20 तास ago