शिरूर तालुका

मलठणमध्ये भीषण अपघात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक अपघातस्थळावरून फरार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण-शिंदेवाडी परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय गणेश रामदास शितकल या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला असून शिरूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही दुर्घटना २२ एप्रिल रोजी रात्री ९. ३० वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश शितकल (रा. कवठे येमाई) हा त्याच्या ताब्यातील बजाज पल्सर (MH 12-LZ-6806) या दुचाकीवरून मलठणकडे जात असताना समोरून येणाऱ्या महिंद्रा सुप्रो टेंपो (MH 16-CD-6852) ने भरधाव वेगाने चुकीच्या बाजूने येत जोरदार धडक दिली. या धडकेत गणेशला गंभीर दुखापत झाली व त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर आरोपी टेम्पोचालक कोणतीही मदत न करता वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. या प्रकरणी गणेशचे काका कैलास बबन कुलके (वय ३५, रा. कवठे येमाई) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या प्रकरणाचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी बनकर हे करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

33 मिनिटे ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

13 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

14 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

14 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

14 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

14 तास ago