शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेत बाल दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करत मोठ्या उत्साहात बाल मेळावा संपन्न झाला आहे.
वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेत आयोजित बाळ मेळाव्याच्या प्रसंगी माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिरबेगम मुल्ला, परदेशी पाहुणे लौरा बटलर, हेमा कॉर्बेट, प्रफुल्ल जयस्वाल यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आयोजित बाल मेळाव्यात लहान बालकांचे नृत्य, खेळ तसेच विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले, तर यावेळी बॅक टू स्कूल या आगामी मराठी चित्रपटाच्या कलाकारांच्या टीमने देखील सदर कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली दर्शवल्याने या बालमेळाव्याला चांगलीच रंगत आली.
बाल दिनाच्या निमित्ताने वढू बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, पेरणे फाटा झोपडपट्टी भागासह परिसरातील ऊसतोड कामगारांची मुले देखील सहभागी झाली होती. बाल दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मुलांना खाऊ तसेच भेटवस्तू देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश दुतोंडे यांनी केले तर मंगेश पोळ यांनी आभार मानले.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक…
शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली सुप्रसिद्ध पिरसाहेबांची पारंपरिक यात्रा…
शिंदोडी (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत माजी…