शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील नाथनगर येथे गोठ्यातील शेळीवर हल्ला करून शेळीला घेऊन जात असताना जवळील विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्या शेळीला घेऊन थेट विहिरीत कोसळला. सदर घटना मंगळवारी (दि.१८) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. त्यांनतर वनविभागाच्या रेस्क्यू टिमने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून ताब्यात घेतले.
सविंदणे (ता. शिरूर) येथील नाथनगर येथे पहाटेच्या सुमारास प्रभू सावळेराम नरवडे यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला केला. शेळीला घेऊन जात असताना त्याला जवळ असलेल्या विहिरीच्या रिंगचा अंदाज न आल्याने त्यावरून उडी मारताना तो थेट शेळीला घेऊन विहिरीत कोसळला. शेळ्यांच्या ओरडण्याचा व विहिरीतून बिबट्याचा आवाज ऐकू आल्याने शेजारील शेडमध्ये झोपलेल्या व्यक्तीला जाग आली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले त्यांना बिबट्या शेळीला घेऊन विहिरीत पडल्याचे दिसून आले. यामध्ये शेळी ठार झाली. तदनंतर नरवडे यांनी घडलेला नागरिकांना सांगितला.
नागरिकांनी घटनेची माहिती शिरुर वनविभागाचे नियतक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांना दिली. तदनंतर वनपरीमंडल अधिकारी भानूदास शिंदे, नियतक्षेत्र अधिकारी नारायण राठोड, वन कर्मचारी हनुमंत कारकुड हे रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिक व ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला पिंजराच्या सहाय्याने सुरक्षित विहिरीतून बाहेर काढत जीवदान दिले आहे.
मुंबई: महाराष्ट्राला केवळ कृषी उत्पादन करणारे राज्य न ठेवता कृषीमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि निर्यात करणारे…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…