महाराष्ट्र

दिविजा वृद्धाश्रमार्फत मिठबाव येथे मोफत मोबाईल दंत चिकित्सक शिबीर :

सिंधुदुर्ग: मिठबाव येथील जिवन शिक्षण शाळा नंबर 1 मध्ये दिविजा वृद्धाश्रमार्फत मोबाईल दंत चिकित्सा शिबीर मोफत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 60 जणांची दातांची तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उद्घाटन उपसरपंच सौ. फाटक व डॉ. मेहुल जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. असलदेतील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमाकडून या वृद्धाश्रमातील आजी आजोबांसह गोर-गरिबांसाठी विविध ठिकाणी अनेक उपक्रम आयोजित केले जातात. खेड्या-पाड्यातील गोर गरीब जनतेला दातांचे उपचार करणे पैशा अभावी शक्य होत नाही. ग्रामीण खेड्या-पाड्यात दंत चिकित्सा दवाखाने नसल्याने दातांचे इलाज करणे वयोवृद्ध लोकांना शक्य होत नाही. अश्या लोकांच्या सेवेसाठी दिविजा वृद्धाश्रमाने त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी मोबाईल दंत चिकित्सक शिबिराचे आयोजन केले होते.

मागील महिन्यात असलदे गावठण येथे या शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी जवळ-जवळ १२५ लोकांनी लाभ घेतला होता. त्यातील ४५ जणांचे खराब, हलत असणारे दात काढण्यात आले. तर ३० जणांचे दात स्वच्छ करण्यात आले. कवळी बसवणे, रूट कॅनल, किडलेले दात साफ करण्यात आले. साफ करून त्यात सिमेंट भरण्यात आले. तर या महिन्यात १५ तारखेला अशाच डेंटल मोबाईल व्हॅन चे आयोजन करून मिठबाव येथील जिवन शिक्षण शाळा नंबर 1 च्या परिसरात दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले. तेथे ६० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये व अविनाश फाटक ह्यांनी केले.या शिबिरात मुंबईहून डॉ किसन गारगोटे व डॉ ऋतिक गारगोटे यांनी रुग्णाचे उपचार केले. तर संस्थेचे सदस्य संजय धवन यांनी मदतीचा हातभार लावला. या कार्यक्रमास मिठबाव गावचे ग्रामस्थ व दिविजा वृद्धाश्रम मधील कर्मचारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

1 तास ago

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

15 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

15 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

15 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

15 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

20 तास ago