शिक्रापूर : शिवराज्य प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, अनुलोम संस्था, भाजपा मन कि बात उत्तर पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायगड दर्शनचे आयोजन निमगाव म्हाळुंगी चे सरपंच तथा शिवराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांच्या तर्फे करण्यात आले होते. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील सरपंच बापूसाहेब काळे यांनी गावातील युवक-युवतींना मोफत रायगड दर्शन घडविले आहे.
किल्ले रायगड दर्शन यात्रेच्या निमित्ताने दिलीप चव्हाण, मनोहर चव्हाण, दादासाहेब घोरपडे, नामदेव काळे, शिवाजी चौधरी, शरद दोरगे, शंकरराव चव्हाण, रेश्मा काळे, ताई दोरगे, सौ. मनोहर चव्हाण, किरण काळे, आर्यन चव्हाण, शिवराज पवार, युवराज चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
गावातील युवक-युवतींनी छत्रपती शिवाजी महाराज यांची सामूहिक शिववंदना घेऊन किल्ले रायगड दर्शनासाठी रात्री साडेअकरा वाजता निघाले. किल्ले रायगड वर पहाटे साडेपाच वाचता पोहचल्यावर सर्वांनी पायी किल्ला चढण्याचा निर्णय घेऊन आनंद घेतला. रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित असणारे तळे पाहिले ज्याचे नाव ‘गंगासागर तलाव’ आहे ते पाहिले.
किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाजवळील भाग ध्वनीलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे कि दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला “हिरकणी बुरूज” असे अशी काही अंगावर काटे आणणारे ठिकाणे या सर्वांनी अनुभवली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी, वाघ्या कुत्रा यांची समाधी, होळीचा महाल, किल्या वरील बाजाराची रचना, जगदीश्वराचे मंदिर अशा स्वरूपाची अविस्मरणीय ठिकाण त्या ठिकाणी यांना पाहायला मिळाली. किल्ला उतरल्यानंतर पाचाड येथील राजमाता माँ साहेब जिजाऊंच्या समाधी स्थळी दर्शन जाऊन दर्शन घेतले व तेथून पुढे पुन्हा गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला. सरपंच बापूसाहेब काळे यांनी किल्ले रायगड दर्शनासाठी आलेल्या सर्व युवक युवतींचे तसेच वय वर्षे 65 असणाऱ्या गावातील शंकरराव चव्हाण यांनी किल्ला पायी चढल्या बद्दल कौतुक करून आभार मानले.
निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिकांनी जपला माणुसकीचा झरा…
निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायतीच्या वतीने अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी…
निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार प्रदान!
निमगाव म्हाळुंगी मध्ये हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरा!
निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…