nimgaon-candel-march

पहेलगाम हल्ला! निमगाव म्हाळुंगीमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च, रॅली…

शिरूर तालुका

शिक्रापूर: जम्मू -काश्मीर मधील पहेलगाम भागात निष्पाप पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निमगाव म्हाळुंगी मध्ये कॅण्डल मार्च रॅली काढून मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

निमगाव म्हाळुंगी मध्ये शिवराज्य प्रतिष्ठाण आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच बापूसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या भागात पर्यटकांवर जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागिरकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि दहशतवाद्याना शिक्षा व्हावी यासाठी सदर रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलीप चव्हाण, दादासाहेब घोरपडे, श्रीमती तान्हूबाई चव्हाण, आशाताई कुंभार, स्वातीताई दोरगे, शिवराज पवार, आर्यन चव्हाण, भूषण दौंडकर, आदित्य कुटे, प्रणित कांबळे, संस्कार महाडिक, युवराज चव्हाण, प्रेम लोखंडे, आदर्श गायकवाड, शौर्य दोरगे, शंभू चव्हाण, राजकुमार कांबळे, साक्षी कुंभार, हर्षदा कुंभार, अनुष्का घोरपडे, प्रांजल दोरगे, तनिष्का घोरपडे, स्वरा सूर्यवंशी, श्रेया सूर्यवंशी यांच्यासह अनेक ग्रामस्थ सदर रॅली मध्ये सहभागी झाले होते.

काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला हा अंत्यत क्रूर पणे असून धर्माच्या नावाखाली त्यांना मारले गेले हे अतिशय निंदनीय आहे. बरेच पर्यटक या हल्ल्या मध्ये जखमी झाले आहेत. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. सरकारने लवकरात लवकर त्या दहशतवाद्यांना फाशी द्यावी म्हणजे आपल्या पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या आत्म्यास शांती मिळून मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना तीच खरी श्रद्धांजली असेल, असे मत निमगाव म्हाळुंगी चे सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळे यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप चव्हाण यांनी केले असून, आशाताई कुंभार यांनी सहभागी झालेल्या देशभक्तांचे आभार मानले.

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांची उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड!

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिकांनी जपला माणुसकीचा झरा…

निमगाव म्हाळुंगी मध्ये हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरा!

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांची उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड!