शिरूर तालुका

Video; शिरुर शहराचा सर्वांगीण विकास शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार : रोहिणी बनकर

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नगरपरिषद निवडणूक लक्षात घेता शिरूरमध्ये शिवसेनेचा प्रचार जोर धरू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली शिरूर शहराचा विकास हेच आमचे प्रमुख ध्येय असल्याचा निर्धार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रोहिणी बनकर व शिवसेना उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

शिरूर शहराच्या प्रगतीला गती देण्यासाठी शिरूर “शहरवासीयांनी आमच्यावर विश्वास ठेवून मतदान रुपी आशीर्वाद द्यावे. शिंदे साहेबांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर खंबीर राहून शिरूरचा चेहरामोहरा बदलू,” असे उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले. प्रचार करताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, सत्ता असो किंवा नसो विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे. शिरूर शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, सार्वजनिक सोयी, आरोग्यविषयक सुविधा तसेच स्त्री-शक्ती आणि युवकांसाठी स्वतंत्र उपक्रम यावर विशेष भर देण्याचा संकल्प उमेदवारांनी केला आहे.

“शिरूरच्या सर्वसामान्य माणसाची कष्टाची कमाई आणि त्यांचे प्रश्न आम्हाला नजरेआड नाहीत. जनतेला फसवणूक न करता पारदर्शक कामगिरी करणार आहोत,” असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिरूर शहरभरात नगरपरिषदेच्या उमेदवार रोहिणी बनकर या व शिवसेनेचे उमेदवार घराघरात जाऊन जनसंपर्क साधत आहेत. सखी, महिला बचतगट, युवक वर्ग, ज्येष्ठ नागरिक सर्वांना संकल्पनापत्र सादर करताना स्थानिकांमध्ये चांगला उत्साह दिसत आहे. नगराध्यक्ष पदासह विविध प्रभागांमधून उभे असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आपल्या प्रभागासाठी केलेल्या योजनांचा तपशीलही जनतेसमोर मांडला. उमेदवारांनी सांगितले की, ‘शिरूर शहराची वाढ ही केवळ सभागृहात होणार नाही, तर लोकांच्या थेट सहभागातून होईल.’

शहरहिताचे दृष्टीकोन समोर: महिला नेतृत्वाला नागरिकांचा प्रतिसाद…
या निवडणुकीत महिलांचे नेतृत्व ठळकपणे पुढे येत आहे. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपल्या भूमिकेतून समतोल, सक्षम आणि कर्तृत्ववान नेतृत्वाचे दर्शन घडवले आहे.
केंद्र आणि राज्यातील जनकल्याणकारी योजनांचा प्रत्येक लाभ शहरातील कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे ध्येय त्यांनी जाहीर केले आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यापासून महिला मतदारांमध्ये आणि बचतगटांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असून प्रचारप्रसाराला चांगली गती मिळत आहे.

प्रभागानुसार उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. प्रत्येक उमेदवाराने प्रभागाचा स्वतंत्र विकास आराखडा मतदारांपुढे ठेवला आहे. यात रस्त्यांचे सुदृढीकरण, स्वच्छता मोहिमा, आधुनिक कचरा प्रक्रिया, पाणीपुरवठा सुधारणा आणि सार्वजनिक प्रकाशयोजना अशा सुविधांचा समावेश आहे.निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश होत असताना शिवसेना उमेदवारांनी नागरिकांना एकच संदेश दिला, ‘मतदानाच्या हक्काचा वापर करा, आणि शिरूरच्या विकासासाठी योग्य प्रतिनिधी निवडा.’

राज्यातलं माझं वजन कमी झालंय: दिलीप वळसे पाटील

शिरूर! दोन वेळा उपनगराध्यक्ष तरीही प्रभागाचा नाही विकास; ऐश्वर्या पाचर्णे यांच्या प्रचाराला मोठी गती…

शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून…

शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण…

शिरूरच्या राजकारणात भूकंप! राजकीय समीकरणेच कोलमडली…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

12 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

15 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

17 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago