dilip-walse-patil
शिरूर : यंदा काय झाले मलाही समजायला मार्ग नाही पण राज्यातले माझे वजन कमी झाले आहे, अशी खंत राज्याचे माजी गृहमंत्री आणि आंबेगाव-शिरूरचे आमदार दिलीप वळसे पाटील त्यांनी बोलून दाखवली आहे.
विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील अल्पमतांनी विजयी झाले आहेत. यामुळे निवडणूक निकालाची बोच त्यांना लागून राहिलेली आहे. मतदारसंघातील जनतेवर ते अजूनही नाराज असल्याचे दिसून येते. पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना मतदारसंघातील लोकांनी आपल्याबरोबर न्याय केला नसल्याचे अप्रत्यक्षपणे वळसे पाटील म्हणाले.
विधानसभेला यावेळी काय झाले, माझे मलाही कळाले नाही. परंतु विधानसभेच्या निकालानंतर राज्यात माझे वजन कमी झाले आहे, अशी खंत वळसे पाटील यांनी बोलून दाखवली. त्याचवेळी गावकऱ्यांनी राष्ट्रवादीच्या तुतारी फुंकणाऱ्या माणसाला किती मतदान केले, याची आकडेवारीही वळसे पाटील यांनी सांगितली.
तुम्ही जसे मला निवडून दिले तसे कालच्या लोकसभेला अमोल कोल्हे यांनाही निवडून दिले. त्यांनीही बरीच काम केली असतील ना? त्यावर गावातील लोकांनी स्मितहास्य करून कोल्हे यांनी काम केले नसल्याची तक्रार केली. तोच धागा पकडून दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना आरसा दाखवला. अमोल कोल्हे यांनी एक रुपयाचे काम केलेले नसतानाही आढळराव पाटील यांच्यापेक्षा २९१ मते तुम्ही (पिंपरी दुमाला गावाने) अमोल कोल्हे यांना जास्त दिली, असे वळसे पाटील म्हणाले.
दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम एकाच मंचावर अन् निकम यांचे केले कौतुक…
विजय मिळालाय पण मी लाजत लाजत फिरतोय: दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; निवडीविषयी म्हणाले…
Video: दिलीप वळसे पाटील यांची साथ सोडण्याचे शेखर पाचुंदकर यांनी सांगितले मुख्य कारण…
दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांचे विरोधकांना प्रत्युत्तर…
मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…
ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…