Leader

शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण…

मुख्य बातम्या राजकीय

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये माजी नगराध्यक्षा सुवर्णा निलेश लंटाबळे आणि अपक्ष उमेदवार आबिद शेख यांसारख्या चर्चेत असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे…
वार्ड क्र. २-ब : आबिद शेख (अपक्ष)
वार्ड क्र. ४ : ऐश्वर्या मोहित साखला (अपक्ष)
वार्ड क्र. ५ : माजी नगराध्यक्षा सुवर्णा निलेश लंटाबळे (अपक्ष)
वार्ड क्र. १२ : राहुल दसगुडे
वार्ड क्र. १२ : महेंद्र पाचर्णे
या पाचही उमेदवारांच्या माघारीनंतर संबंधित वॉर्डातील निवडणुकीच्या समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विशेषतः वार्ड क्रमांक ५ आणि २-ब मधील उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अनेक गटांच्या तयारीवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

माजी नगराध्यक्षा सुवर्णा लंटाबळे यांच्या माघारीनंतर त्या कोणाला पाठिंबा देतात याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर आबिद शेख यांच्या अचानक माघारीमागे कोणते राजकीय गणित आहे, यावरही तर्क-वितर्कांना उधाण आले आहे उद्या दि. २१ शुक्रवार रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, आणखी काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अंतिम यादीसमोर आल्यानंतरच शिरूर नगरपरिषद निवडणुकीतील खरी लढत कोण-कोणात आहे याचा स्पष्ट अंदाज येणार आहे.

आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोक पवार हे शिरूर मध्ये दाखल होऊन उमेदवारांचा आढावा घेऊन त्यांना मार्गदर्शन करून निवडणुकीची रणनीती ठरवत आहे. भाजपाने जोरदार प्रचार सुरु केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रचार दौऱ्यात शिरूरमध्ये येण्याची चर्चा होत आहे. एकूणच महायुतीमध्ये बेनवाब झाल्यामुळे अनेक जणांना वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून लढण्याची संधी मात्र मिळाली आहे. आता अपक्ष फॉर्म भरलेले उमेदवार उमेदवारी अर्ज माघारी घेतात की लढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून…

शिरूर नगराध्यक्ष, नगसेवक निवडणूकीत पाच अर्ज अवैध, लक्ष आता माघारीकडे…