शिरुर तालुक्यात ६० हजारांची लाच घेतल्याने लाचलुचपत विभागाची ग्रामसेवक महिलेवर कारवाई

कारेगाव (तेजस फडके) गावातील पेवर ब्लॉक बसवलेल्या कामाच्या बिलाचा मोबदला म्हणुन दहा हजार रुपये तसेच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणुन पन्नास हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपये लाच मागत ती रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याप्रकरणी एका महिला ग्रामसेविकेवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे.

शिरुर तालुक्यातील भांबर्डे येथे ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असणाऱ्या निर्मला कैलास भुजबळ (वय ४४) पंचासमक्ष ६० हजारांची रोख रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन त्यांच्याविरुद्ध रांजणगांव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्याअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांनी सन २०२०-२०२१ मध्ये ग्रामपंचायत भांबर्डे येथे पेवर ब्लॉक बसवले असुन त्या कामाच्या बिलाचा मोबदला तसेच त्यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडीचे केलेल्या बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणून निर्मला भुजबळ यांनी तक्रारदाराकडे एकुण बिलाच्या सहा टक्के अथवा ६० हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी दि २७ मार्च २०२५ रोजी लाच पुणे येथील लालुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.

त्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि १ एप्रिल २०२५ व दि ३ एप्रिल २०२५ तसेच १५ एप्रिल २०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता. लोकसेवक निर्मला भुजबळ यांनी वरील नमुद कामासाठी तक्रारदाराकडे एकुण बिलाच्या सहा टक्के अथवा ६० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

दि २८ एप्रिल २०२५ रोजी लाचलुचपत विभागाच्या सापळा कारवाईमध्ये लोकसेवक निर्मला भुजबळ यांनी तक्रारदाराकडुन ग्रामपंचायत भांबर्डे येथे पेवर ब्लॉक बसवलेल्या कामाच्या बिलाचा मोबदला म्हणुन १० हजार रुपये तसेच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणून ५० हजार रुपये असे एकूण ६० हजार रुपये लाचेची रक्कम भांबर्डे ग्रामपंचायत कार्यालय येथे पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

त्यांच्या विरुद्ध रांजणगांव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्याअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पुणे परिक्षेत्र, पुणे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

शिरुर; कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या महिला सरपंचाच्या पतीची मेहुण्याच्या नावावर MIDC मध्ये दहशत…?

शिरुर; चार वर्षात सरपंच फक्त नामधारी ग्रामपंचायतच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्या महाशयांचीचं लुडबुड…?

Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

22 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago