शिरूर तालुका

शिरुरच्या तहसीलदारपदी बाळासाहेब म्हस्के यांची नियुक्ती

प्रदिर्घ कालावधीनंतर अखेर प्रभारी राज संपले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयातील प्रभारी राज तब्बल दोन वर्षांनी संपले असून शिरूर तहसिल कार्यालयाला आता कायमस्वरूपी तहसीलदार मिळाले आहे. बाळासाहेब म्हस्के यांची अखेर शिरूर तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षापासून शिरूर तालुक्याचे तहसीलदार पद हे रिक्त होते.कायमस्वरूपी तहसीलदार मिळावे याबाबत नागरिकांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती.

दरम्यान लैला शेख यांची भ्रष्ट्राचारामुळे २०२१मध्ये तडकाफडकी बदली झाल्यामुळे त्यानंतर प्रभारी तहसीलदार म्हणून रंजना उंबरहंडे , प्रशांत पिसाळ, बालाजी सोमवंशी यांनी काम पाहीले होते. दरम्यान नुकतेच राज्य शासनाकडून बदलीचे आदेश निघाले असून नागपूर रामटेक येथील तहसीलदार बाळासाहेब दादासाहेब म्हस्के यांची शिरूर येथे रिक्त पदावर बदली करण्यात आली आहे. या बदली आदेशामुळे शिरूर येथे कायमस्वरूपी तहसीलदार मिळाले आहे.

शिरूर तालुक्यात असलेली पंचतारांकित औद्यगिक वसाहत,नव्याने करडे येथे सुरू असलेल्या एमआयडीसी प्रकल्पाचे काम,तालुक्यात जमिनीचे आलेले सोन्याचे भाव यामुळे वाढलेली जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार देखील प्रंचड प्रमाणात वाढले असून सर्वसामान्य नागरिकांची कामे गेल्या काही दिवसांपासून खोळंबली आहेत.

पुरवठा विभागात नवीन, विभक्त रेशनकार्ड तीन महीने ऊलटूनही मिळत नाही. सहा -सहा महीने रेशनकार्ड ऑनलाईन होत नाही. संजय गांधी प्रकणात बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्यांवर अदयाप कारवाई झाली नाही. १५५च्या केसेसचे निकाल, रस्ता केसेसची, गौण खनिज आदी प्रकरणे प्रंलबित आहेत. सर्वाधिक महसूल खात्यात चिरीमिरी चालत असून भ्रष्ट्राचार थांबवून नागरीकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आव्हान नवनिर्वाचित तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्यापुढे असणार आहे.

मोठ्या प्रमाणावर गाजलेल्या भ्रष्टाचारामुळे शिरूर तहसिल कार्यालयातील तहसिलदार लैला शेख यांची तकडाफडकी बदली करण्यात आली होती आपल्यावरील संकटे दुर करण्यासाठी त्यांनी आपल्या केबिनला चक्क बोकडाचा नैवैदय दाखवल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते.त्यांनतर आलेल्या प्रभारी तहसिलदार रंजना उंबरहांडे यांच्यावरही भ्रष्ट्राचारामुळे लाललुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होता. यामुळे शिरुर तहसिल कार्यालयाची प्रतिमा मलिन झाली असून ती सुधारण्याचे आव्हान नवीन तहसिलदारांपुढे असणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

6 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago