शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानकात अनेक समस्या असल्याने प्रवाशांना येथील समस्यांचा सामना करावा लागत असून तातडीने या समस्या सोडवाव्यात अन्यथा भाजपा महिला आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी भाजप अल्पसंख्याक महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कोमल भगवे, उपाध्यक्षा सृष्टी करंजुले,ओबीसी शहराध्यक्षा सुशीला गोसावी,नितु शर्मा,सुषमा फंड,राजेंद्र महाजन, प्रितेश फुलडाळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरूर बसस्थानकात विविध समस्या असल्याने प्रवाशांची, वृध्दांची,महिलांची तसेच शालेय विद्यार्थ्यांना येथील समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यातदेखील बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसुन पाणपोई महिला स्वच्छतागृहाशेजारी करण्यात आली आहे परंतु तेथे पाण्याची सोय नसणे,फलाटवर बस वेळेवर न लागणे,वारंवार बस नादुरुस्त असणे,प्रवासात बस मध्येच बंद पडणे,अचानक बस रद्द होणे,बस स्थानक परिसरात व स्वच्छतागृहात अस्वच्छता,स्वच्छतागृहामध्ये महिलांना पैशाची मागणी करणे,बस स्थानकात बस आत येण्या – बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग असुन त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले,याच मार्गावर नादुरुस्त बस उभ्या असणे,बसस्थानकात महिलांच्या सुरक्षिततेसाठी होमगार्ड चंदाताई चांगले काम करीत आहे परंतु त्यांच्याबरोबर आणखी दोन पोलीस कॉन्स्टेबल असावे. यांसारख्या विविध समस्यांचे लवकरात लवकर सोडविण्यात येऊन प्रवासांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा भाजपा महिला आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देण्यासाठी आलेल्या सर्व भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक मनिषा गायकवाड व बसस्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी यांना घेऊन बसस्थानक परिसरातील विविध समस्या समक्ष फिरून दाखवल्या व त्याठिकाणीच निवेदन देण्यात आले
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…