शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर घवघवीत यश मिळवत संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
इयत्ता दुसरी मधील कृष्णा रामचंद्र देशमुख याने १४४ गुण मिळवत संपूर्ण राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. शिवण्या अजित पडवळ याने १३८ गुण मिळवत राज्यात सातवा आणि पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. त्याचबरोबर अनुष्का मंगेश पोखरकर (१२८ गुण), आरोही योगेश पडवळ (१२६ गुण), दुर्वा प्रदीप पडवळ (११८ गुण) आणि राजवीर अविनाश पडवळ (१०८ गुण) यांनी देखील चांगले यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक लहू मनाजी शितोळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता तिसरीतील साईराज सुभाष पडवळ याने २४२ गुण मिळवले असून कृष्णा राहुल मिंडे याने २१६ गुण प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षक दत्तात्रय अनंतराव चिकटे सर यांनी मार्गदर्शन केले.
इयत्ता चौथीतील आर्यन रमेश पडवळ याने २१४ गुण प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी बजावली. या यशस्वी विद्यार्थ्याला वर्गशिक्षक रमेश भाऊ बोखारे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांना श्री. गणेश बाळू पवार सर यांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल केंद्रप्रमुख सखाराम फंड सर, विस्तार अधिकारी, तसेच गटशिक्षणाधिकारी मा. बाळकृष्ण कळमकर साहेब यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
शाळेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, सर्व सदस्य तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्यावर अभिमान व्यक्त केला आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…