शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथील कुकडी नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या गायकवाड परिवारातील मुलगा अक्षय (वय -१२) हा आज मंगळवार (दि. 25) रोजी सकाळी दहा ते सव्वा दहा च्या दरम्यान नदीच्या पाण्यात पडला असून त्याला शोधण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.
पुणे व नगर जिल्ह्याची सरहद्द असलेल्या कुकडी नदीच्या एका बाजूला पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द व दुसऱ्या बाजूला शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक गाव आहे. या गावांना जोडणाऱ्या पुलाजवळ शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक हद्दीत नदी काठी पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथील दांपत्य राहुल नानाभाऊ गायकवाड, विमल राहुल गायकवाड हे मुलगा अक्षय व एक दहा वर्षाची मुलगी यांच्यासह कपडे धुण्यासाठी आले होते.
गायकवाड दांपत्य कपडे धुत असताना त्यांचा मुलगा अक्षय हा पाय घसरुन पाण्यात पडला, त्यावेळी त्याची आई विमल यांनी ते पाहताच त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. शेजारी असलेल्या लोकांच्या निदर्शनास येतात त्यांनी मुलाच्या आईला पाण्यातून बाहेर काढले.मात्र मुलाचा शोध लागला नाही. मुलाने कपडे काढलेले होते त्यामुळे त्याचा शोध घेण्यात स्थानिकांना अडचणी येत आहेत.
घटनेची माहिती मिळताच म्हसे बुद्रुकचे सरपंच सौरभ पवार, सामाजिक कार्यकर्ते काळूराम पवार, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मुसळे, म्हसे खुर्द चे सरपंच प्रवीण उदमले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेची माहिती टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांना देताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ पारनेरचे आमदार निलेश लंके तसेच शिरुर आणि पारनेर पोलीस स्टेशन यांना ही माहिती दिली. आमदार निलेश लंके यांनी तहसीलदार यांना कळवून तातडीने मदत करण्याची सूचना दिली आहे.
नदीमध्ये वाहत्या पाण्यातही स्थानिक तरुणांनी अक्षय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तरीही त्यांना अक्षय मिळून न आल्याने स्पेशल रेस्क्यू टीम बोलविण्यात आली आहे. या ठिकाणी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती सुदामराव पवार,म्हसे बुद्रुक चे पोलीस पाटील वर्षा पवार, पांडुरंग खाडे, निघोज पोलीस दूरक्षेत्र व टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्र चे कर्मचारी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जाऊन शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
ऐन दिवाळीत अशी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तब्बल 5 तास उलटूनही प्रशासकीय मदत न मिळाल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासकीय मदतीची अपेक्षा व्यक्त करत मुलाचा शोध कधी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…