क्राईम

तळेगाव ढमढेरेत वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल समोरुन संतोष बढेकर हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ ई सि ६४८८ या दुचाकीहून जात असताना तळेगाव ढमढेरे बाजूने आलेल्या एका अज्ञात वाहनाची बढेकर यांना धडक बसून अपघात झाला. या अपघातात बढेकर हे जखमी झाल्याने त्यांना शिक्रापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र उपचारापूर्वी संतोष सखाराम बढेकर (वय ४७) रा. रांजणी ता. आंबेगाव जि. पुणे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत रमेश किसान बढेकर (वय ३२) रा. रांजणी ता. आंबेगाव जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संसदेत चर्चा नाही, पण मंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्राचे प्रश्न! तटकरे मैदानात; ४३८ कोटींच्या निधीसह कोकणासाठी मोठ्या मागण्या

मुंबई-गोवा महामार्गाच्या टोलनाक्यांपासून जलजीवन मिशनच्या ४३८ कोटींपर्यंत मुद्दे केंद्रीय मंत्र्यांकडे मांडले मुंबई: लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात…

14 तास ago

शिक्रापूर येथील सलूनमध्ये काम केलेल्या युवकाच्या कारस्थानाचा पर्दाफाश…

पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या…

17 तास ago

संसदेत पुढील आठवडा ठरणार निर्णायक

सीमांकन, महिला आरक्षण आणि FCRA विधेयकांवरून सरकार-विरोधक आमनेसामने नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा…

19 तास ago

जळगावात शाळकरी विद्यार्थ्यावर चॉपरने हल्ला; जुन्या वादातून दहावीतील विद्यार्थ्याला गंभीर दुखापत

जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना…

19 तास ago

परदेशात नोकरीचं आमिष; पोर्तुगालमध्ये महिलेला शरीरविक्रीसाठी दबाव? पुण्यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा गंभीर आरोप

पुणे : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या महिलांना चांगला पगार आणि उज्ज्वल भविष्याचं आमिष दाखवून त्यांची…

19 तास ago

व्यावसायिकावर गोळीबार करणारे उज्जैन येथून जेरबंद…

शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद…

20 तास ago