शिरूर तालुका

टाकळी हाजी येथे बैलाचा दशक्रिया विधी संपन्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील साबळे वाडीतील पोपट कोंडीबा साबळे यांनी त्यांच्या राजा या बैलाचा दशक्रिया विधी सोमवारी (दि. १३) संपन्न केला.

साबळे यांच्या घरच्या गायी कडून जन्म झालेल्या गोऱ्हयाने शर्यतीमध्ये भाग घेवून अनेक घाट गाजविले आहेत. 24 वर्षे वयाच्या घरातील एक सदस्याचे (राजा बैलाचे) 10 दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्यांनी हिंदू धर्म परंपरेने मनुष्याच्या विधिप्रमाने दशक्रिया विधी संपन्न केला. घाटाचा राजा हा किताब या बैलामुळे साबळे यांच्या बैलगाड्यास अनेकदा मिळाला आहे.

पाळीव प्राण्यांविषयची आस्था जोपासत आजही शेतकरी प्राणी मात्रांवर जीवापाड प्रेम करत आहेत. यांत्रिक युगात जरी शेती सुधारित पद्धतीने केली जात असली तरी बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने शर्यतीचे बैल म्हणजे शेतकऱ्यांची मोठी संपत्ती मानली जात आहे.

यावेळी टाकळी हाजी चे सरपंच दामुशेठ घोडे, बैलगाडा विमा कंपनीचे शिरूर आंबेगाव चे उपाध्यक्ष बन्सीशेठ घोडे, माजी उपसरपंच सखाराम खामकर, सामाजिक कार्यकर्ते अंकुश उचाळे, अंकुश शितोळे, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अशोक मेचे, बैलगाडा मालक आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

4 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

8 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

9 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago