शिरूर तालुका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या माईनगरी शिरुर येथील आश्रमाला सदिच्छा भेट

शिरुर (अरुणकुमार मोटे) अनाथांची माई पद्मश्री डॉ.सिंधुताई सपकाळ यांच्या माईनगरी शिरूर घोडनदी येथील मनःशांती छात्रालय अनाथ आश्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या शिरूर येथील मनःशांती अनाथ आश्रमातील अनाथ,गरजू आणि निराधार विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत वाढदिवस साजरा केला.

 

तसेच आश्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी सन्मानित केले. पद्मश्री सिंधुताई सपकाळ माईंचे कार्य आणि त्याग विद्यार्थ्यांना सांगून माईंविषयी आदर व्यक्त केला आणि संस्थेची माहिती जाणून घेतली. संस्थेची माहिती घेऊन अजित पवारांचे मन भारावून गेले. त्यांनी अनाथ व गरजु मुलांबरोबर संवाद साधून संस्थेचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ यांना मुलांसाठी संस्थेला काहीही गरज पडल्यास निसंकोचपणे संपर्क करावा अशा सूचना दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ, कार्यकारी अध्यक्ष यश सूर्यवंशी, प्रकल्प व्यवस्थापक सचिन ढोरमले, अधिक्षीका मिनाक्षी लटांबळे, अधिक्षक दिनेश लोखंडे, शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

शिरुर तालुका डॉट कॉम; च्या बातमीचा प्रभाव; शिरुर न्यायालयाने केली नियमित बंदुकधारी पोलिसाची मागणी

शिरुर तालुक्यातील करडे गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरु; जनतेतुन सरपंचपदासाठी अनेकजण इच्छुक

शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचांच्या धिंगाण्यानंतर पुन्हा मित्र-मैत्रिणीची हाणामारी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago