शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील ७ सार्वत्रिक ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या असुन त्या सात ग्रामपंचायत मध्ये करडे गावचीही पंचंवार्षिक निवडणुक होत आहे. करडे ग्रामपंचायतसाठी इतर मागास प्रवर्ग महिला (OBC) आरक्षण असुन गावातील अनेकजण सरपंचपदासाठी इच्छुक असुन गावातील माजी सैनिक नंदकिशोर रोडे यांच्या पत्नी पुष्पा रोडे यांच्यासह अनेकजण ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत.
करडे गावची लोकसंख्या अंदाजे ७ ते ८ हजारांच्या आसपास असुन गावचं मतदान ३३०० आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीचा टप्पा क्रं तीन अंतर्गत करडे येथे औद्योगिक वसाहत झाली असल्याने या गावात जमिनीचे बाजारभाव गगनाला भिडले आहेत. पेंशव्याच्या काळापासून करडे हे गाव प्रचलित असुन ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांच्यामुळे तसेच शिरुर-केडगाव चौफुला रस्त्यालगतच हे गाव असल्याने तालुक्यात गावाची एक आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे.
करडे येथील नंदकिशोर रोडे यांनी आपल्या मातृभूमीची १६ वर्ष सेवा केल्यानंतर गावामध्ये ते समाजकारणात सक्रीय झाले. गावातील अनेक सामाजिक कामात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. तसेच रोडे यांनी आजी-माजी सैनिकांना एकत्र करत संघटनेच्या माध्यमातुन आजपर्यंत काम केले आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव चंदू रोडे हे गावातील अनेक सामाजिक कामात अग्रेसर आहेत.
चंदू रोडे यांनी गावात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन गावातील युवकांना एकत्र करत अनेक सामाजिक उपक्रम राबविले. तसेच स्वतःच्या सी आर फाउंडेशन मार्फत प्रतिकुल परिस्थितीशी झगडून स्वप्न सत्यात साकारण्यासाठी धडपडणाऱ्या स्पर्धा परीक्षाची तयारी करत असलेल्या गरजु व होतकरु विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची फी तसेच पुस्तकांसाठी आर्थिक मदत करण्यात येते. सीआर फाउंडेशन मार्फत स्पर्धा परीक्षेतील काही यशस्वी विद्यार्थी सध्या पुणे तसेच रायगड पोलीस दलात, पुणे महानगरपालिका, राज्य विक्रीकर तसेच मंत्रालयात विविध पदांवर कार्यरत आहेत.
करडे गावाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी तसेच गावातील अनेक बेरोजगार स्थानिक तरुणांना औद्योगिक वसाहतीत नोकऱ्या किंवा व्यवसाय मिळावेत. यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच गावातील महिलांसाठी औद्योगिक वसाहतीतील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यामधील सी एस आर (CSR) फंडातुन सामूहिकरीत्या काही उद्योग- व्यवसाय उभा करता येईल का यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचे सरपंचपदाच्या इच्छुक उमेदवार पुष्पा नंदकिशोर रोडे यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले.
शिरुर येथे राष्ट्रवादी (शरद पवार गट) व रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप
शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचाचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?
शिरुर-पाबळ रस्त्यासाठी होतोय चक्क मातीचा वापर; सार्वजनिक बांधकाम उपविभाग निद्रीस्त