स्वराज्य बहुजन सेनेकडून भिल्ल व उसतोड कामगारांना दिवाळी

शिक्रापूर (शेरखान शेख): स्वराज्य बहुजन सेना नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवीत असताना आता नुकतेच स्वराज्य बहुजन सेनेकडून भिल्ल समाज व उसतोड कामगारांना दिवाळीचे वाटप करत भिल्ल समाज व उसतोड कामगारांची दिवाळी गोड करण्यात आली आहे.

डिंग्रजवाडी ता. शिरुर येथील भिल्ल वस्ती तसेच ऊसतोड कामगारांच्या घरांजवळ जाऊन स्वराज्य बहुजन सेनेच्या वतीने दिवाळी वाटप करण्यात आली. यावेळी स्वराज्य बहुजन सेनेचे अध्यक्ष राजाराम दगडे पाटील, नितीन भवार, विठ्ठल तळोले, स्वाती शिवले, रेखा भंडारे, मेघा गवारे, स्नेहलता दगडे पाटील, अक्षय ठोंबरे यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान भिल्ल समाज तसेच ऊसतोड कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांना ऐन दिवाळी मध्ये गोड मिठाई मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता, तर याबाबत बोलताना सदर भिल्ल समाजातील नागरिकांसह ऊस तोड कामगारांच्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदातून समाधान मिळाले असून पुढील काळात सदर समाजासाठी मोठ्या प्रमाणात आदी उपक्रम राबवणार असल्याचे स्वराज्य बहुजन सेनेचे अध्यक्ष राजाराम दगडे पाटील यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

22 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

22 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

22 तास ago