शिरूर तालुका

शिक्रापुरात अधिकाऱ्याच्या निरोप दरम्यान कर्मचारी गहिवरले

ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैजिनाथ काशीद यांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद यांची वैद्यकीय अधीक्षक पदी झालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचा ग्रामीण रुग्णालय व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान व निरोप समारंभ आयोजित करण्यात आलेला असताना त्यांच्या सन्मान प्रसंगी भावना व्यक्त करताना अनेक कर्मचाऱ्यांना गहिवरुन आल्याचे दिसून आले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद यांची वैद्यकीय अधीक्षक पदी झालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला, याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, रेखा बांदल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्चना शेडे, विद्युत वितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, ग्राहक पंचायतचे रमेश टाकळकर, पतंजली योग समितीचे अंकुश घारे, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, भूमाता ब्रिगेडच्या मंगल सासवडे, करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, वैद्यकीय अधिकारी सुप्रिया गावडे, डॉ. पवन सोनवणे, डॉ. शरद लांडगे, डॉ. चंद्रकांत केदारी, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मांढरे, महेश साबळे पाटील, संतोष काळे, अतुल थोरवे, माजी सरपंच जयश्री भुजबळ, आरोग्य सहाय्यक जालिंदर मारणे, संतोष चोपडा, शशिकांत भवर, आरोग्य सेविका प्रिया जाधव, उज्वला टेमगिरे, कांचन गुल्लाने, स्वाती झगडे, आरती निकाळजे, रुपाली मोरे, आशा सेविका स्वाती शिंदे, कल्पना ढोकले, आरती घुमे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. वैजिनाथ काशीद यांचा निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या वतीने विशेष सन्मानचिन्ह तसेच अनेक पदाधिकाऱ्यांच्या वतीने विविध भेटवस्तू देत सन्मान करण्यात आला तर यावेळी आपल्या अधिकाऱ्याबाबत भावना व्यक्त करताना काही कर्मचाऱ्यांना गहिवरुन आले असून डॉ. काशिद यांनी दिलेली शिकवण आयुष्यातील वाटचालीसाठी दिशा देणारी असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले, तर शिक्रापूर वासियांचे प्रेम मी आयुष्यभर विसरु शकत नसल्याची भावना वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशिद यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सहाय्यक जालिंदर मारणे यांनी केले तर आरोग्य सेविका प्रियांका जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

डॉ. काशीद म्हणजे माणसातील देव माणूस…

शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात नागरिकांना आरोग्य सेवा देणारे डॉ. वैजिनाथ काशिद म्हणजे माणसातील देवमाणूस असून त्यांच्या कृतीचा अनेकांनी आदर्श घ्यावा असे मत यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

6 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago