शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील शासकीय ओढ्याला पावसाच्या पाण्याने पूर आल्याने ओढा फुटून पाणी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतातील सोयाबीन सह पेरुच्या बागेचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
हिवरे कुंभार (ता. शिरुर) सह परिसरात 2 दिवस पाऊस झाल्याने परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. परिसरात अनेक ठिकाणी ओढ्याला पूर येऊन काही ठिकाणी ओढे फुटून ओढ्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेले असून येथील शंकर गायकवाड या शेतकऱ्याच्या शेतात ओढ्याचे पाणी शिरुर पेरुच्या तब्बल 200 झाडांसह सोयाबीनचे पिक पाण्यात गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
एकीकडे शेतकरी बाजार भाव व पावसामुळे होणाऱ्या नुकसान मुळे मोठ्या अडचणीत सापडलेला असताना गायकवाड यांच्या शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानी मुळे ते हवालदिल झाले आहेर तर यापूर्वी देखील शेतात अशाच पद्धतीने पाणी शिरल्याने महसूल विभागाकडे याबाबत तक्रार देऊन देखील त्यांनी काहीच उपाययोजना केली नसल्याने गायकवाड पुन्हा अडचणीत सापडले असून शासनाने आता तरी दखल घेऊन ओढ्यातील पाणी शेतात न जाण्याबाबत काही उपाययोजना करुन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी शंकर गायकवाड यांनी केली आहे.
हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील शंकर गायकवाड या शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत हिवरे कुंभारच्या तलाठी अनुजा घुगे यांच्याशी फोनवर वारंवार संपर्क साधला असता तलाठी अनुजा घुगे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…