शिरूर तालुका

दोन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या BVG कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करा:- नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मधील फियाट कंपनीमध्ये दोन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या BVG कंपनीच्या संचालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर घटनेची चौकशी होऊन BVG कंपनीच्या संचालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

रांजणगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये फियाट कंपनीमध्ये काही दिवसांपुर्वी मच्छिंद्र दादाभाऊ काळे आणि सुभाष सुखदेव उघडे या दोन कामगारांचा ड्रीम एरिया जवळील मैलाच्या चेंबरमध्ये काम करत असताना पडून मृत्यू झाला होता. सदर कामगार हे फियाट कंपनीमध्ये BVG कंपनीच्या मार्फत कंत्राटी कामगार म्हणून हाउस कीपिंगचे काम पाहत होते. मात्र या कामगारांना कुठल्याही प्रकारच्या सेफ्टीबाबत प्रशिक्षण न दिले गेल्यामुळे या कामगारांचा मृत्यू झाला आहे. कित्येक दिवस उलटूनही या प्रकरणाची चौकशी होत नसल्यामुळे नाथा शेवाळे यांनी मुंबई मंत्रालय येथे या प्रकरणात बाबत अप्पर मुख्य सचिव (गृह विभाग) आणि पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर घटनेची चौकशी होऊन BVG कंपनीच्या संचालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलिस महासंचालकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे अशी नाथा शेवाळे यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

13 मिनिटे ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

1 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

4 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

4 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

5 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

5 तास ago