कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील अनेक कंपन्यामध्ये मलाच सगळीकडे काम मिळाली पाहिजेत असा अट्टहास करत MIDC लगतच ग्रामपंचायत असल्यामुळे इतर लोकांना कंपनीमध्ये मिळालेले ठेके दादागिरी करत स्वतःकडे घेण्याचा सपाटा एका माजी सरपंच महिलेच्या पतीने लावला आहे.
या महाशयांनी स्वतःची पत्नी चार वर्षे सरपंच असताना ग्रामपंचायत मध्ये कारभारनीच्या नथीतुन अनेक तीर मारत ग्रामपंचायतमधील विविध ठेके स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदारांना दिले. तसेच स्वतःच्या पत्नीचा पदाचा गैरवापर करत रांजणगाव MIDC मधील एका कंपनीला ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर तुमच्या कंपनीमुळे प्रदुषण होत असल्याबाबत पत्नीच्या सहीने पत्र दिले. त्यानंतर त्याच कंपनीत विविध कामाचे ठेके मिळाल्यानंतर परत त्या कंपनीकडुन कसलेही प्रदुषण होत नसल्याबाबत ग्रामपंचायतच्या लेटरपॅडवर MPCB महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांना स्वतःची पत्नी आणि ग्रामसेवक यांच्या सहीने पत्र दिले.
रांजणगाव MIDC त सध्या या महाशयांचे विविध कामाचे ठेके सुरु असुन या महाशयांचे माजी सहकार मंत्री आणि आंबेगाव-शिरुर मतदार संघांचे आमदार दिलीप वळसे पाटील तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे हे महाशय कोणालाच दाद देत नसल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा आहे. त्यामुळे कामाच्या ठेक्यावरुन भविष्यात रांजणगाव MIDC मध्ये संघर्ष पहायला मिळणार आहे.
(क्रमशः)
रांजणगाव पोलिसांची कारेगाव येथील यश इन चौकात गुटख्यावर कारवाई
रांजणगाव MIDC पोलिसांनी उसतोड मजुर पत्नीचा खुन करुर फरार झालेल्या आरोपीस केली अटक
रांजणगाव MIDC त कामगारांना खोलीत डांबुन ठेवत मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन अटकेत
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…