आरोग्य

अक्कलदाढ आणि अक्कल यांचा संबंध असतो का? अक्कलदाढ येताना का होतात वेदना

सगळी दुखणी परवडली, पण दातांची दुखणी नको, हे का म्हटले जाते ते अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. प्रत्येकाला या टप्प्यातून जावेच लागते, त्यामुळे अनुभव येतो आणि सदर वाक्यामागच्या भावना लक्षात येतात. दात किडणे, ठणकणे, पडणे, फट येणे अशा अनेक समस्यांमध्ये आणखी एक तापदायक समस्या म्हणजे अक्कल दाढ येणे. बत्तीशी पूर्ण झाली की साधारण १६ ते १८ व्या वयात अक्कलदाढ येते. अनेकांना हा अनुभव वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरही येतो.

बालवयात दात येताना जेवढ्या वेदना होतात, त्याच्या कितीतरी पट वेदना अक्कलदाढ येताना होतात. कारण, बत्तीशी पूर्ण आल्यानंतर अक्कल दाढेसाठी जागाच उरत नाही. सगळ्या दंतपंक्तींच्या पाठोपाठ तिची घुसखोरी होते आणि जागेअभावी असह्य वेदना होतात.

अक्कलदाढेला अक्कल दाढ का म्हणतात

या वयात मनुष्य सर्व साधारण पणे सर्व बाबतीत म्हणजे शारिरीक, मानसिक, सामाजिक, धार्मिक, लैंगिक इ. बाबतीत बर्या पैकी सज्ञान होतो.अगोदरच्या वयात पोरकट पणा जास्त असतो.थोडक्यात पुरेशी अक्कल त्या वयात येते म्हणून त्या वयात उगवणाऱ्या दाढांना अक्कल दाढा म्हणतात. इंग्लिशमध्येही त्याला ‘विस्डम टीथ’ असे नाव आहे. विस्डम अर्थात शहाणपण! या वयात ते येणं अपेक्षित असते. अशा या अक्कलदाढा दातांच्या शेवटच्या भागात वरील बाजूला दोन व खालील बाजूला दोन अशा उगवतात.

अक्कलदाढ कधी काढावी लागते

अक्कल दाढ सर्वांत उशिरा येते. तोपर्यत तोंडातील इतर दात आलेले असतात.

अक्कल दाढेमुळे इतर दातांवर काही वेळ दबाव येतो. इतर दातांना त्रास होतो. त्या दाढांना यायला जागा नसते. त्याचा इतर दातांवर परिणाम होतो.

काहीवेळा वेदनासुद्धा होतात, त्यावेळी मात्र एक्स रे काढून पहिला जातो आणि मग रुग्णाला होणारा त्रास पाहून अक्कल दाढ काढली जाते.

अक्कलदाढेच्या दुखण्यावर घरगुती उपाय

मीठाच्या पाण्याने गुळण्या: दिवसातून दोन-तीन वेळा मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास सूज कमी होते आणि वेदना कमी होतात.

बर्फ: बर्फ लावल्याने सूज आणि वेदना कमी होतात.

लवंगाचे तेल: लवंगाचे तेल कापसाला लावून दाढदुखीच्या जागी लावल्यास वेदना कमी होतात.

पेरूचे पान: पेरूच्या पानांचा रस किंवा पेस्ट दुखत्या जागी लावल्यास आराम मिळतो.

हळद: हळदीमध्ये वेदना कमी करण्याचे गुणधर्म असतात. हळद, मीठ आणि मोहरीचे तेल एकत्र मिसळून पेस्ट तयार करा आणि नंतर प्रभावित भागावर चांगले चोळा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

5 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

5 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

5 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

5 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

6 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

11 तास ago